Poultry Farming : अंड्यांचा व्यवसाय हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. कोंबडी आणि अंडी पाळून लोक पैसे कमवतात. आपल्याकडे बरेच लोक हा व्यवसाय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. एक सामान्य कोंबडी 4,6 किंवा 10 अंडी देते. पण आज आपण अशा कोंबडीबद्दल माहिती पाहणार आहोत जी एका दिवसात 31 अंडे घालते. चलातर मग जाणून घेऊया याबद्दल माहिती.
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैन या ठिकाणच्या कोंबडीने एका दिवसात 31 अंडी देऊन अनोखा विक्रम केला आहे. एवढी अंडी देण्याची माहिती ऐकून प्रत्येकजण कोंबडी पाहण्यासाठी पोहोचत आहे. यामुळे या कोंबडीची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. (Chicken farming)
आम्ही खास शेतकऱ्यांच्या फ़ायदासाठी Hello Krushi हे ॲप बनवले आहे. या ॲपमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर आमचेHello Krushi हे ॲप लगेचच इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला सरकारीयोजना, बाजारभाव, हवामान अंदाज, पशूंची खरेदी विक्री, त्याचबरोबर रोपवाटिकांची माहिती आणि अन्य कृषी विषयक माहिती मिळेल त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप इंस्टाल करा.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत घालते अंडी
या कोंबडीने तासा-दोन तासात 31 अंडी घातली नसून ही कोंबडी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हळूहळू अंडी घालत राहिली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या कोंबडीने पहिले अंडे दिले .त्यानंतर अंडी घालण्याची प्रक्रिया सुरूच राहिली. रात्री 10 वाजेपर्यंत कोंबडीने 31 अंडी घातली. एका दिवसात एवढी अंडी देण्याची घटना पहिल्यांदाच ऐकायला मिळत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
कोंबडी शेंगदाणे, लसूण खाते –
माहितीनुसार, उत्तराखंडमधील रहिवासी गिरीश ही कोंबडी पाळत आहेत. ही कोंबडी शेंगदाणे आणि लसूण खाण्याची शौकीन असल्याची माहिती त्यांनी दिली. ती दररोज सुमारे 200 ग्रॅम शेंगदाणे खाते. लसूणही भरपूर खाते.शेंगदाणे खातात. याशिवाय इतर अन्न फारच कमी खाते खाते.