Poultry Feed Business : पोल्ट्री खाद्यनिर्मिती व्यवसायातुन मिळेल दुप्पट नफा; वाचा… सविस्तर माहिती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय (Poultry Feed Business) शेतकऱ्यांना करता येतात. कृषी क्षेत्र हे खूप व्यापक असून, यामध्ये खूप मोठ्या व्यावसायिक संधी दडलेल्या आहेत. शेती करत असताना बरेच शेतकरी पशूपालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालन यासारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. शेतीसोबतच या व्यवसायांशी संबंधित देखील अनेक प्रकारचे व्यवसाय (Poultry Feed Business) शेतकरी उभारू शकतात.

कुक्कुटपालनाचा विचार केला तर या व्यवसायात कोंबड्यांसारखी मोठ्या प्रमाणावर खाद्याची (Poultry Feed Business) आवश्‍यकता भासते. त्यामुळे कोंबडी खाद्य बनवण्याचा व्यवसाय उभारला तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण कोंबडीचे खाद्य व्यवसायाबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

आवश्‍यक घटक कोणते? (Poultry Feed Business)

कोंबडी खाद्य बनवण्याचा व्यवसाय करायचा असेल. तर तुम्हाला त्यासाठी अगोदर तुम्हाला कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करायचे आहे हे निश्चित करावे लागेल. कारण कोंबडी खाद्यामध्ये चिक, बॉयलर आणि लेयर अशा तीन प्रकारच्या कोंबड्यांचा यामध्ये समावेश होतो. यासाठी तुम्हाला कच्चामाल म्हणून तांदूळ, मका, सोयाबीन, गहू, मीठ, फिश मील इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.

कशा प्रकारे बनवतात पोल्ट्री फीड?

पोल्ट्री फीड बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. परंतु हिट अँड ट्रायल खाद्य पद्धती खूप सोपी आहे. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला जे काही खाद्य तयार करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणते धान्य वापरून ते तयार करायचे आहे हे निश्चित करणे गरजेचे आहे. त्यानंतर खाद्यामध्ये आवश्‍यक असणारे जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस तसेच सूक्ष्म खनिज व औषधांचे मिश्रण हे प्रती 100 किलो किंवा 1000 किलोच्या संकेत निश्चित करावे लागते. हे निश्चित झाल्यानंतर तुम्हाला ते ग्राइंडरमध्ये दळावे लागते व त्यानंतर आपल्या गरजेनुसारते जाड किंवा बारीक ते ठरवावे लागते.

10, 25, 50 किलोच्या गोण्या

लहान पिलांसाठी चिक स्टार्टर तयार करावे लागते. म्हणजेच बारीक प्रकारचे खाद्य लागते व मोठ्या कोंबड्यांना थोडे जाडे-भरडे खाद्याची (Poultry Feed Business) आवश्‍यकता असते. त्याला आपण फिनिशर असे देखील म्हणतो. निश्चित केलेल्या खाद्य सूत्रानुसार वजन केलेले सर्व साहित्य सुमारे सहा मिनिटे ते दहा मिनिटे मिक्सरद्वारे मिक्स करून घ्यावे. त्यानंतर तुम्हाला खाद्याची कॅटेगरी कोणते आहे. त्यानुसारच बॅग पॅक कराव्या लागतात. यामध्ये तुम्ही 25 किलो तसेच 50 किलो व दहा किलो प्रमाणात बॅग भरू शकतात.

किती लागते भांडवल?

पोल्ट्री खाद्य व्यवसायासाठी तुम्हाला पाच ते दहा लाख रुपये भांडवल लागते. याशिवाय पोल्ट्री खाद्य बनवण्यासाठी तुम्हाला मका, सोयाबीन, गहू, ज्वारी, तांदूळ,मीठ, शिंपला फूड, फिश मील इत्यादी प्रकारचा कच्चामाल लागतो. यासाठी ग्राइंडर व मिक्सर या दोन यंत्रसामुग्रीची आवश्यकता लागते. यामध्ये ग्राइंडरसाठी तुम्हाला दोन लाख रुपये तसेच मिक्सरसाठी साडेतीन लाख रुपयेपर्यंत आवश्यकता भासते. तसेच तुमच्याकडे दोन किंवा तीन मोठे यंत्र असतील तर तुम्हाला लागणारे मनुष्यबळ आहे पाच ते दहा इतके लागते.

माल कुठे विकाल?

तुमचे तयार पोल्ट्री खाद्य तुम्ही परिसरातील किंवा इतर ठिकाणच्या पोल्ट्री फार्म मालकांना भेटून त्यांच्या ऑर्डर घेऊ शकतात किंवा पोल्ट्री खाद्य विक्री करणाऱ्या दुकानाची संपर्क साधून तुमचे तयार पोल्ट्री खाद्य अशा दुकानांना विकू शकतात. अर्थात पोल्ट्री खाद्य व्यवसायातून वार्षिक मोठी कमाई तुम्ही करू शकतात.

error: Content is protected !!