Poultry Feed : कोंबड्यांना नेमके कोणते खाद्य द्यावे? जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Poultry Feed : आपल्याकडे अनेकजण पोल्ट्री उद्योग करतात. या उद्योगातून नफा देखील चांगला मिळतो त्यामुळे अनेक शेतकरी (Farmer) हा उद्योग करताना दिसत आहेत. काहीजण मोठा पोल्ट्री उद्योग करतात तर काहीजण छोटा पोल्ट्री उद्योग करतात. मात्र या सगळ्यांमध्ये कोंबड्यांचे खाद्य नियोजन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की पोल्ट्री उद्योगात एकूण खर्चापैकी जवळपास 60 ते 70 टक्के खर्च हा कोंबड्यांच्या खाद्यावर होत असतो. त्यामुळे कोंबड्यांच्या खाद्यात कोणते कोणते घटक असावेत याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

पक्षांना खाद्य देताना त्याचे व्यवस्थित नियोजन केले तर आपल्याला त्याचा योग्य तो नफा देखील मिळेल त्यामुळे पक्षांना खाद्य देताना त्याचे पिल्ले ब्रॉयलर आणि लेअर अंडी देणाऱ्या अशा तीन प्रकारात खाद्य नियोजन करावे. यामधील एकूण खाद्यापैकी फक्त 35 ते 45 टक्के खाद्याचे रूपांतर मास किंवा अंड्यात होत असते त्यामुळे खाद्य देताना काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. (Poultry Feed)

ज्या कोंबडी दररोज अंडे देतात अशा कोंबड्यांना कमीत कमी ओलावा असलेले ताजे खाद्य द्यावे. त्यामध्ये प्रोटीन, चरबी, खनिज पदार्थ, विटामिन्स कार्बोहायड्रेट, याचे संतुलन असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कोंबडीच्या खाद्यामध्ये वनस्पतीजन्य प्रथिने आणि प्राणीजन्य प्रथिनांचा समावेश अवश्य करावा. पक्षांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थांचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करावा.

त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, गहू, मका, तांदूळ या धान्यांमध्ये पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे पक्षांच्या खाद्यामध्ये हे घटक असणे गरजेचे आहे. अंडी देणाऱ्या एका कोंबडीला दिवसासाठी 110 ग्रॅम खाद्य लागते तर गावरान कोंबडीला 130 ते 150 ग्रॅम खाद्य लागते.

error: Content is protected !!