Poultry Loan : पोल्ट्री फार्मसाठी मिळते ‘इतक्या’ लाखांचे कर्ज; पहा एका क्लिकवर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असून, अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) करतात. यावर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या घराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. विशेष म्हणजे वेगवेगळ्या राज्य सरकारकडून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाते. मात्र त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील आघाडीची बँक पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी 75 टक्के पर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. जर आपणही आपल्या गावात पोल्ट्री व्यवसाय करू इच्छित असाल? तर कर्ज उपलब्ध करण्यासाठी तुम्हीही अर्ज करू शकतात. ज्यामुळे तुम्ही शेतीसोबतच पोल्ट्री व्यवसायातून चांगला नफा मिळवू शकतात.

कर्जाचे स्वरूप (Poultry Loan For Farmers By State Bank Of India)

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कडून शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) सुरू करण्यासाठी एकूण खर्चाच्या 75 टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाते. उर्वरित 25 टक्के रक्कमेची उभारणी शेतकऱ्यांना करावी लागते. त्यासाठी तुम्हाला बँकेला प्रोजेक्ट अहवाल द्यावा लागेल. त्या प्रोजेक्टच्या आधारावर बँक तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देईल. उदारणार्थ तुम्ही 2 लाख रुपये गुंतवणूक करत पोल्ट्री व्यवसाय सुरू केल्यास, आणि बँकेने तुमचा प्रोजेक्ट अहवाल स्वीकारला. तर तुम्हाला 1.50 लाख रुपयांचे कर्ज एसबीआयकडून उपलब्ध होईल. बाकी 50 हजार रुपयांची उभारणी तुम्हाला स्वतःला करावी लागणार आहे.

किती वर्षांसाठी मिळेल कर्ज?

पोल्ट्री फार्मसाठी तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला एसबीआयकडून जास्तीत जास्त 9 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. जर तुम्ही 9 हजार पक्षांपासून व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला 3 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकेल. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून हे कर्ज शेतकऱ्यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून दिले जाते. यावरील व्याज दराची सुरुवात ही 10.75 टक्के इतकी असते. विशेष म्हणजे हे कर्ज 3 ते 5 वर्ष या कालावधीसाठी दिले जाते. जर तुम्हांलाही पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते तुम्हाला 3 ते 5 वर्षात पूर्ण हफ्ते भरावे लागतील.

असा करा अर्ज

जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल तर सर्वप्रथम जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जावे लागेल. या ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्जासंबंधी सर्व माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला एक प्रोजेक्ट बनवून बँकेला सादर करावा लागेल. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला उल्लेख करावा लागेल की तुम्ही किती खर्चात पोल्ट्री व्यवसाय सुरू करत आहात. त्यानंतर बँकेने तुमचा प्रोजेक्ट अहवाल स्वीकारल्यास, बँकेकडून कर्जाची रक्कम तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल.

किती कर्ज मिळू शकेल?

पोल्ट्री उद्योगासाठी नाबार्डनेही एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही पोल्ट्री व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला कमीत कमी 10 हजार पक्षांपासून लेअर पोल्ट्री फार्मची सुरुवात करावी लागेल. यासाठी तुमच्या स्वतःकडे कमीत कमी 4 ते 5 लाखांचे भांडवल असणे आवश्यक आहे. यासाठी येणाऱ्या खर्चाच्या 75 टक्के म्हणजे जवळपास 27 लाख रुपयांचे कर्ज बँक तुम्हाला नाबार्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ शकते. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क साधावा. पोल्ट्री फार्मिंगसाठी सरकारकडूनही अनुदान दिले जाते. केंद्र सरकारकडून सामान्य वर्गाला पोल्ट्री उभारण्यासाठी 25 टक्के अनुदान मिळते. तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गासाठी 33 टक्के अनुदान मिळते. हे अनुदान बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर दिले जाते.

error: Content is protected !!