Poultry Vaccines: कोंबड्यांना होणारे विविध रोग आणि लस व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कुक्कुटपालन व्यवसाय जर यशस्वी करायचे असेल तर कोंबड्यांचे घर, खाद्य, पाणी व्यवस्था या सोबतच त्यांना होणार्‍या रोगांचे (Poultry Vaccines) योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. रोगांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काही रोग कोंबड्यांसाठी प्राणघातक सुद्धा ठरू शकतात. त्यामुळे हे रोग होण्यापूर्वीच त्यासाठी प्रतिबंधक लस (Poultry Vaccines )घेणे गरजेचे असते. विविध रोग, त्यासाठी उपलब्ध असणारी लस आणि देण्याची पद्धती याबाबत जाणून घेऊ या.

रोगाचा प्रसार होण्याची कारणे (Causes of Disease Spread)

  • शेडमधील रोगबाधित पक्ष्यांच्या विष्ठेतून, नैसर्गिक स्राव यातून रोगकारक जंतू पक्ष्याचे खाद्य, पाणी दूषित करतात. असे पाणी इतर पक्ष्यांनी प्यायल्यास, त्यांना त्या रोगाची लागण होऊ शकते, त्याचप्रमाणे दूषित खाद्य खाल्ल्यास त्या रोगाचा प्रादुर्भाव इतर पक्ष्यांना होतो.
  • शेड अस्वच्छ असल्यास, अशा वातावरणात रोगकारक जंतूंची वाढ झपाट्याने होते.
  • शेडमध्ये प्रत्येक पक्ष्यास योग्य जागा न मिळाल्यास, त्यांना स्वच्छ, शुद्ध हवेचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पक्षी गुदमरून मृत्युमुखी पडू शकतात. गर्दीच्या वातावरणात पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.- शेड निर्जंतुक करूनच पक्षी शेडमध्ये सोडावेत.
  • सर्व खाद्यभांडी, पिण्याची भांडी निर्जंतुक करून वापरावीत.
  • निकृष्ट प्रतीचे खाद्य, रोगप्रतिकारशक्ती कमी करते हे लक्षात घ्यावे.
  • शेडमधील लिटर ओले झाल्यास अशा वातावरणात रोगकारक जंतूंची वाढ झपाट्याने होते. रोगाचा प्रादुर्भाव (Poultry Vaccines) मोठ्या प्रमाणात होतो. उदा. रक्ती हगवण.
  • आजारी पक्षी आणि निरोगी पक्षी एकाच घरात असतील, तर रोगांचा प्रसार त्वरित होतो.
  • रोगाचा प्रसार झालेल्या शेडमधील भांडी, उपकरणे, काम करणारे कामगार, त्यांच्या अंगावरील कपडे, त्याच्या वाहनाबरोबर बाहेरील जंतू दुसऱ्या शेडमध्ये येऊन रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
  • रोगाने मेलेले पक्षी जाळून टाकावेत. कारण शेडबाहेर टाकले तर कुत्रा, घारी, कावळे यांच्यामार्फत रोगाचा प्रसार होतो.

विविध रोग आणि लसीकरण तक्ता (Poultry Vaccines)

वयरोगलसीचे नांवटोचणीची पध्‍दत
1 दिवसमॅरेक्‍समॅरेक्‍सपाण्याच्या स्नायूमध्ये
5–7 दिवसराणीखेतलासोटानाकात एक थेंब टाका
4 आठवडेश्वासनलिकेचा संसर्गजन्य रोगलासोटाडोळ्यात दोन थेंब टाका
5 आठवडेराणीखेतलासोटापिण्याच्या पाण्यातून
6 आठवडेदेवीदेवी लसपंखाखाली कातडीतून टोचून
8 आठवडेराणीखेतराणीखेत आर 2 बीपंखाखाली कातडीतून टोचून
18 आठवडेदेवीदेवी लसपंखाखाली कातडीतून टोचून
20 आठवडेराणीखेतराणीखेत आर 2 बीपंखाखाली कातडीतून टोचून
22 आठवडेपिसे उपटणेचोचीचा शेंडा कापावा
10–12  आठवडेपिसे उपटणेवरच्या चोचीचा शेंडा कापून डाग देऊन बोथट करावा.

वरील रोगा व्यतिरिक्त इतर काही रोग व जंतु सुद्धा कोंबड्यांना होतात त्यांचे उपाय खालीलप्रमाणे करावे (Poultry Vaccines)

रोगरोग होण्याचा कालावधीउपाय
1) कॉक्सिडिऑसिसओलसरपणामुळे केव्हाही होतो.कॉक्सिडिओस्‍टॅट, बायफ्रुरॉन – फूरानीन इ. द्यावे गादी कोरडी करावी.
2) जंतसर्व वयात होतातजंताचे औषध दर 3 महिन्‍यांनी पाण्यातून द्यावे, स्वच्छता ठेवावी.
3) अंगावरील उवा गोचीड, पिसवा इ.सर्व वयात होतातस्वच्छता ठेवावी, पक्षी / मॅलॅबियॉन / सुमीथियॉनने फवारावेत.

लसीकरण करताना घ्यायची काळजी (Precautions To Be Taken During Poultry Vaccination)

  • रोगप्रतिबंधक लस नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी.
  • लसीकरण करण्यासाठी नेताना रोगप्रतिबंधक लस बर्फ ठेवलेल्या भांड्यातूनच न्यावी.
  • वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये.कारण त्या लसीची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झालेली असते.
  • वापरून उरलेली लस, बाटल्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.
  • लसीकरणासाठी वापरलेली सिरिंज, सुया, भांडी स्वच्छ धुऊन निर्जंतुक करून घ्यावी.
  • लसीच्या उत्पादक कंपनीचे नाव, लसीचा प्रकार, बॅच नंबर, लस तयार केलेली तारीख, लस उपयोगात आणण्याची अंतिम तारीख याचा तपशील नोंद करून लस वापरावी.
  • लस टोचल्यानंतर पक्ष्यांना थकवा येऊ शकतो. याकरता लस टोचण्यापूर्वी तीन दिवस अगोदर आणि लस टोचणीनंतर पाच ते सहा दिवस सर्व पक्ष्यांना पाण्यातून अँटिबायोटिक्स द्यावीत.
  • उन्हाळ्यात लस टोचणीचा कार्यक्रम असेल, तर रोगप्रतिबंधक लस (Poultry Vaccines) सकाळी किंवा रात्री टोचावी. म्हणजे पक्ष्यांवर ताण येणार नाही.
  • रोगप्रतिबंधक लसीकरण फक्त सशक्त पक्ष्यांना करावे.
  • एका वेळी एकच लस टोचावी. एकाच वेळी दोन किंवा तीन लस दिल्यास रोगप्रतिकारशक्ती तयार होणार नाही. उलट पक्ष्यात रिॲक्शन येऊन नुकसान होऊ शकते.
error: Content is protected !!