Powertrac Tractor : 5 वर्ष वॉरंटीसह 35 एचपीचा पॉवरफुल ट्रॅक्टर; वाचा… कितीये किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशात सध्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील पिकांचा काढणी (Powertrac Tractor) हंगाम पूर्णतः आटोपला आहे. शेतकरी प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या कालवधीनंतर एप्रिल महिन्यात वार्षिक कमाई हाती आल्यानंतर तिचा योग्य वापर करण्याचे नियोजन करत असतात. यात काही शेतकरी हे नवीन ट्रॅक्टर खरेदीचे नियोजन करत असतात. त्यामुळे आता तुम्ही देखील तुमच्या शेतीसाठी एखादा पॉवरफुल ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल. तर पॉवरट्रक कंपनीचा ‘पॉवरट्रक 434 प्लस’ हा ट्रॅक्टर (Powertrac Tractor) तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे.

‘पॉवरट्रक 434 प्लस’ ट्रॅक्टरबद्दल (Powertrac Tractor For Farmers)

पॉवरट्रक कंपनीचा ‘पॉवरट्रक 434 प्लस’ हा ट्रॅक्टर (Powertrac Tractor) 2146 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 35 हॉर्स पावरचे इंजिन दिले असून, ते एव्हीएल टेक्नॉलॉजी कॅट इंजिन स्वरूपात उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ऑइल बाथ टाइप एयर फिल्टर दिला आहे. या ट्रॅक्टरची कमीत कमी पीटीओ पॉवर ही 31 एचपी इतकी आहे. या ट्रॅक्टरचे इंजिन 2000 आरपीएमची निर्मिती करते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 50 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिली आहे. हा ट्रॅक्टर 1600 किलो वजन उचलण्यास सक्षम असून, त्याचे वजन हे 1850 किलो इतके आहे. याशिवाय कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 3512 एमएम लांबी, 1754 एमएम रुंदीसह 2060 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केले आहे. तर या ट्रॅक्टरला 375 एमएम इतका ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहे.

काय आहेत फीचर्स?

  • पॉवरट्रक कंपनीने आपल्या ‘पॉवरट्रक 434 प्लस’ या ट्रॅक्टरला पॉवर स्टीयरिंग तसेच मेकॅनिकल सिंगल ड्रॉप आर्म ऑप्शनल स्टीयरिंग दिली आहे.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स दिला आहे.
  • हा ट्रॅक्टरला तुम्हाला सिंगल टाइप क्लचमध्ये उपलब्ध आहे. त्यास फुलली कॉन्स्टन्ट मेश ट्रांसमिशन देण्यात आले आहे.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 36.5 किमी प्रति तास इतका वेग दिला आहे.
  • हा शक्तिशाली ट्रॅक्टर मल्टी प्लेट ऑइल इमर्जड ब्रेक्ससह उपलब्ध आहे.
  • ‘पॉवरट्रक 434 प्लस’ हा ट्रॅक्टर टू व्हील ड्राइवमध्ये उपलब्ध आहे.
  • कंपनीकडून आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस (15.24 cm X 40.64 cm) 6 inch X 16 inch आकारात तर मागील बाजूस (34.54 cm X 71.12 cm) 13.6 inch X 28 inch आकारात तयार देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

पॉवरट्रक कंपनीने आपल्या या ‘पॉवरट्रक 434 प्लस’ ट्रॅक्टरची शोरूम किंमत 6.20 लाख ते 6.50 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स वेगवेगळे असल्याने, या ट्रॅक्टरची किंमत ही वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी असू शकते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 5 वर्षांची वॉरंटी प्रदान केलेली आहे.

error: Content is protected !!