Powertrac Tractor : 28.5 एचपीचा सर्वात दमदार छोटा ट्रॅक्टर; वाचा… किंमत आणि वैशिष्ट्ये?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये मागील काही दिवसांमध्ये छोट्या ट्रॅक्टरचे (Powertrac Tractor) महत्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जमिनीचे तुकडे होत असल्याने, कमी जमिन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा शेतकऱ्यांना अधिक किमतीचे ट्रॅक्टर शेतीसाठी घेणे परवडणारे नसते. ज्यामुळे छोट्या ट्रॅक्टरला महत्व प्राप्त झाले आहे. तर काही शेतकऱ्यांना मोठ्या ट्रॅक्टरला सोबत म्हणून फळबाग आणि अन्य शेतीसाठी छोट्या ट्रॅक्टरची नियमित गरज पडते. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा छोटा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर पॉवरट्रक कंपनीचा ‘युरो जी28’ हा छोटा ट्रॅक्टर (Powertrac Tractor) तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. आज आपण या ट्रॅक्टरबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

पॉवरट्रक ‘युरो जी28’ ट्रॅक्टरबद्दल (Powertrac Tractor For Farmers)

पॉवरट्रक कंपनीचा ‘युरो जी28’ हा छोटा ट्रॅक्टर (Powertrac Tractor) शेतकऱ्यांना 1318 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. ज्यास 28.5 एचपी क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून, ते 80.5 एनएम इतका टॉर्क जनरेट करते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ड्राय टाईप एअर फिल्टर दिलेला आहे. जो इंजिनला धूळ मातीपासून यापासून सुरक्षित ठेवतो. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला कमीत कमी 22 एचपी इतकी पीटीओ पॉवर दिली आहे. ज्यामुळे या ट्रॅक्टरचे इंजिन 2800 आरपीएमची निर्मिती करू शकते. याशिवाय या ट्रॅक्टरला 24 लीटर क्षमतेची डिझेल टाकी देण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर 750 किलोग्रॅम वजन उचलण्यास सक्षम असून, त्याचे वजन 990 किलो इतके आहे.

काय आहेत फीचर्स?

  • पॉवरट्रक कंपनीने ‘युरो जी28’ या छोट्या ट्रॅक्टरला पॉवर स्टीयरिंग दिली आहे.
  • पुढील बाजूस 9 आणि मागील बाजूस 3 रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने सिंगल टाइप क्लच दिला असून, तो फुलली कॉन्स्टन्ट मेश ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे.
  • पॉवरट्रक कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला 25.5 किमी प्रतितास इतका वेग दिला आहे.
  • याशिवाय या ट्रॅक्टरला मल्टी प्लेट ऑइल इमर्जड डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहे.
  • हा ट्रॅक्टर फोर व्हील ड्राइवसह उपलब्ध आहे.
  • कंपनीने या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 6.00 X 12/ 5.0 x 12 आकारात आणि मागील बाजूस 8.3 x 20 / 8.0 x 18 आकारात टायर दिलेले आहे.

किती आहे किंमत?

पॉवरट्रक कंपनीने आपल्या ‘युरो जी28’ या छोट्या ट्रॅक्टरची किंमत भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन निश्चित केली आहे. त्यानुसार हा ट्रॅक्टर 5.45 लाख ते 5.65 लाख रुपये या शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळी राहू शकते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 3 वर्षांची वॉरंटी प्रदान केलेली आहे.

error: Content is protected !!