Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana: प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांना (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana) पेन्शन सुरू करण्यासाठी ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’ सुरू करण्यात आली होती. मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार (Unorganized Sector Workers) या योजनेचा (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana) लाभ घेऊ शकतात. जाणून घेऊ या योजनेबद्दल सविस्तर.

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची उद्दिष्टे (PMSYM Yojana)

  • असंघटीत क्षेत्रातील कामगारांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन (Pension Scheme) देऊन या योजनेद्वारे त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे
  • वृद्धापकाळात त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजने अंतर्गत त्यांना स्वावलंबी व सशक्त बनवणे.
  • असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळातील आयुष्य जगण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सहारा नसतो. म्हणून केंद्र सरकार (Central Government) अशा योजना अंतर्गत सर्व गरीब आणि मजूरांना या योजने अंतर्गत प्रतिमहा 3,000/- रुपयापर्यंतची पेन्शन (Pension) देऊन आर्थिक मदत करणे
  • निश्चित उत्पन्नाचे स्रोत नसणाऱ्या कामगारांना दिलासा देणे

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे लाभ (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana)

  • या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर प्रतिमहा 3,000/- रुपये इतकी पेन्शन दिली जाईल.
  • लाभार्थ्यांची पेन्शन रक्कम ही त्याच्या प्रिमियम रकमेवर अवलंबून असेल. त्याने जेवढी योगदान रक्कम भरलेली आहे, त्या रकमेनुसार सरकार तुमच्या खात्यात पैसे जमा करेल.
  • जर लाभार्थी या योजने अंतर्गत पेन्शन घेताना मरण पावला, तर त्याच्या पेन्शनच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम त्याच्या जोडीदाराला पेन्शन म्हणून दिली जाईल. म्हणजेच लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला 1,500/- रुपये प्रतिमहा पेन्शन मिळेल.

योजनेचे लाभ कोण घेऊ शकतो? (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana)

  • भूमिहीन शेतमजूर
  • लहान आणि सीमांत शेतकरी
  • पशुपालक आणि दगडाच्या खाणी मध्ये लेबलिंग आणि पॅकिंग करणारे
  • कोळी
  • पशुपालक
  • बांधकाम आणि पायाभूत सुविधा कामगार
  • स्थलांतरित मजूर
  • विणकर
  • सफाई कामगार
  • भाजी आणि फळ विक्रेता
  • घरगुती कामगार

योजनेसाठी आवश्यक पात्रता (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana)

  • अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे
  • योजनेसाठी बँक खाते असणे अनिवार्य आहे
  • अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार असावा
  • अर्जदार व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15,000/- रूपयांपेक्षा जास्त नसावे
  • अर्जदाराकडे आधार क्रमांक आणि मोबाईल फोन असणे आवश्यक आहे
  • अर्जदार आयकर भरणारा नसावा
  • सरकारी कर्मचारी भविष्य निधी (EPF) राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ESIC) चे सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत

आवश्यक कागदपत्रे

  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना रजिस्ट्रेशन (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana)

इच्छुक अर्जदाराला अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रांसह जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रांमध्ये जावे लागेल. यानंतर अर्जदाराला आपली सर्व कागदपत्रे सीएससी अधिकाऱ्याला द्यावी लागतील. यानंतर सीएससी अधिकारी एजंट तुमचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनाचा ऑनलाईन फॉर्म भरेल. अर्ज भरून झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट तुम्हाला देईल. या अर्जाची प्रिंट आउट तुम्ही तुमच्याकडे भविष्यासाठी सुरक्षित ठेवा. अशाप्रकारे तुमचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची साठीचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होईल.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना का हेल्पलाइन नंबर

अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा 1800 267 6888

error: Content is protected !!