कीटकनाशकांच्या वापराबद्दल कोणती खबरदारी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | शेतीसाठी कीटकनाशके ही खूप महत्त्वाची आणि अविभाज्य घटक आहेत. कोणतेही पीक असले तरी त्या पिकानुसार आणि त्यावर पडणाऱ्या रोगानुसार कीटकनाशके वापरावी लागतात. कीटकनाशक कमी वापरली आणि जास्त वापरली तरीही त्याचे वेगवेगळे परिणाम पिकावर होताना दिसतात. यासोबतच, कीटकनाशके विषारी आणि मौल्यवान असल्यामुळे याचा वापर प्रमाणात होणे गरजेचे आहे. तसेच, जास्त कीटकनाशके वापरल्यानंतर तो शेतीमाल बाजारामध्ये अथवा परदेशांमध्ये विकणेही कठीण होऊन जाते. त्यामुळे कीटकनाशके वापरतांना काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

आपल्या शेतामधील पिक आणि त्या पिकावरील पडलेले अथवा संभाव्य रोग यांचा अंदाज घेऊन कोणती कीटकनाशके वापरायची हे प्रथमता ठरवणे गरजेचे आहे. जर, आपल्याला या गोष्टीमधील पूर्ण ज्ञान नसेल तर, स्थानिक तज्ञ अथवा शासकीय कृषी अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे. कीटकनाशक मारण्याची योग्य वेळ आणि त्याचे प्रमाण समजून घेतले पाहिजे. कीटकनाशकांची शुद्धता दाखवण्यासाठी कीटकनाशकांच्या बाटलीवर हिरव्या निळ्या आणि पिवळ्या किंवा लाल रंगाचे चिन्ह दाखवले जाते. लाल रंगाचे चिन्ह असलेले कीटकनाशक अतिशय विषारी असून, ते सस्तन प्राण्यांवर जास्त नुकसान देतात. हिरव्या रंगाचे कीटकनाशक कमी आणि हानीकारक आहेत.

कीटकनाशक खरेदी करताना त्यावर असलेली उत्पादन तारीख व एक्सपायरी डेट तारीख पाहणे अतिशय गरजेचे आहे. जर मुदत संपलेले औषध- कीटकनाशक आपण पिकांवर मारले तर, त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांवर त्याचा आर्थिक परिणाम होतो. प्रत्येक कीटकनाशकांसोबत ते वापरण्याची आणि हाताळण्याची पद्धती लिहुन आलेली असते. ती काळजीपूर्वक वाचावी. किटकनाशकांची साठवणूक स्वच्छ हवेशीर आणि कोरड्या जागी करावी. कीटकनाशक फवारताना शेतकऱ्याने संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालणे गरजेचे आहे. हातामध्ये रबराचे हातमोजे, तोंडावर मास्क आणि डोळ्याच्या संरक्षणासाठी चष्मा घालणे आवश्यक आहे. फवारणीच्या वेळी जर वारा जास्त असेल तर, फवारणी करणे टाळावे. कीटकनाशके लहान मुलांच्या अथवा पाळीव प्राण्यांच्या संपर्कात येतील असे ठेवू नये.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!