Grain Storage: धान्याची साठवणूक करताय? अशी घ्या काळजी, करा हे उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जगभरात काढणी पश्चात साठवणुकी दरम्यान धान्याचे (Grain Storage) मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यात 26% नुकसान कीड व रोगामुळे, 33% धान्यातील तणांमुळे, तर 15% धान्याचे नुकसान उंदीर, पक्षी व इतर प्राण्यामुळे होते. किडींचा विचार करता साठवणीच्या काळात प्राथमिक व दुय्यम अशा दोन प्रकारच्या किडीमुळे धान्याचे नुकसान होते. हे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी (Grain Storage) व कोणते उपाय करावे याबाबत जाणून घेऊ या.

धान्य साठवणूक करताना अशी घ्या काळजी (Precautions while Storing Grains)

  • बियाणे मळणी करण्यासाठीचे खळे कोठारपासून लांब अंतरावर असावे.
  • बियाणे साठवणुकीपूर्वी कडक उन्हात वाळवावे.
  • बियाणे साठविण्यापूर्वी रिकामी पोती, कणग्या, साठविण्याची जागा व्यवस्थित साफ करून कीड विरहित करावी.
  • साठवणुकीच्या जागेतील उंदराची बिळे, भिंतीचे छिद्रे व भेगा सिमेंटच्या सहाय्याने बुजवून घ्याव्यात, खिडक्यांना लोखंडी तारेच्या जाळ्या लावाव्यात.
  • बियाणे साठविण्यासाठी (Grain Storage) शक्यतो नवीन गोण्या /पोते वापरावे. जुने वापरात असल्यास गोण्या /पोते गरम पाण्यात ५० अंश सेल्सिअस तापमानापेक्षा अधिक १५ मिनिटे भिजवून नंतर सुकवून वापरावे.
  • उघड्या धान्यावर कीटकनाशकाची फवारणी करू नये.
  • धान्याची पोते लाकडी फळ्या किंवा बांबूच्या काठ्यावर भिंतीपासून ३ फूट लांब अंतरावर ठेवावेत.
  • साठवणुकीच्या जागेतील परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.
  • पावसाळ्यात बियाणे हवाबंद ठिकाणी ठेवावे, उन्हाळ्यात बियाणे मोकळी हवा मिळेल असे ठेवावे.

साठवणुकीच्या किडींचे रासायनिक नियंत्रण उपाय (Chemical Control Measures for Grain Storage)

  • शेतातील उंदरांसाठी विषारी आमिष: 380 ग्रॅम भरडलेले गहू/ज्वारी/ मका धान्य + 10 मिलि गोडेतेल (शेंगदाणा किंवा जवस तेल) + 10 ग्रॅम झिंक फॉस्फाइड (80%) पावडर मडक्यात घालून काडीने चांगले ढवळावे. या विषारी आमिषाच्या 10 ग्रॅमच्या गोळ्या तयार कराव्या. गोळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून त्या सीलबंद करून एक प्लॅस्टिकची 10 ग्रॅमची आमिषाची पिशवी एका बिळात ठेवावी.
  • धान्य साठवणुकीपूर्वी रिकामी पोती, साठवणुकीची जागा, रिकामी कणगी तसेच वाहतुकीची साधने फवारणी करून निर्जंतुक करावी, (Precautions while Storing Grains) यासाठी  मॅलेथिऑन (50%प्रवाही) 10 मिली + दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. उघडे धान्य, जनावरे लहान व लहान मुले यांना फवारणी पासून लांब ठेवावे. यांना कीटकनाशकाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.
  • सोंडे, खपरा भुंगा, दातेरी भुंगा, सुरसा/पतंग, व कोळी यासारख्या धान्य साठवणुकी दरम्यान येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी अॅल्युमिनियम फॉस्फाईड 150 ग्रॅम पावडर 100 घन मिटर जागेसाठी किंवा 10 ग्रॅम पाऊच प्रति टन बियाण्यासाठी 5 ते 7 दिवस संपर्कात ठेवावे.

सूचना: कोणतीही रसायने वापरण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखालीच रसायनाचा वापर साठवणुकीतील धान्यावर करा (Grain Storage).  

error: Content is protected !!