Precautions While Spraying Pesticides: पिकांवर कीटकनाशक व रोगनाशक औषधे फवारणी करताय? मग अगोदर हे वाचा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Precautions While Spraying Pesticides: शेतात वापरात येणारी आधुनिक रोगनाशके व कीटकनाशके यांचा योग्य रीतीने वापर न केल्यास मनुष्य व इतर पाळीव जनावरे यांच्या जि‍वितास धोका निर्माण होऊ शकतो. या विषारी औषधांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने पुढील सूचना काळजीपूर्वक पाळाव्या (Precautions While Spraying Pesticides).

१. सर्व विषारी औषधांच्या बाटल्यांवर अगर डब्यांवर मोठ्या अक्षरामध्ये त्या औषधाचे नाव घालून ती औषधे थंड व कोरड्या जागी कुलुपामध्ये सुरक्षित ठेवावीत. ती मुला बाळाच्या हाती लागणार नाहीत,याची काळजी घ्यावी.

२. कीटकनाशक व रोगनाशक औषधांच्या पिशव्या काळजीपूर्वक फोडाव्या. तसेच कीटकनाशक औषधे असलेल्या बाटल्यांची झाकणे सावकाश उघडावीत (Precautions While Spraying Pesticides).

३. बऱ्याच वेळा पिकांवर फवारण्याचे औषध आजूबाजूच्या गवतावर पडण्याचा संभव असतो. म्हणून त्यापासून जनावरांना धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी.

४. खाद्यपदार्थ, इतर औषधे व लहान मुले यांच्याशी औषधांचा संपर्क येऊ देऊ नका.

५. औषध मारण्याच्या कामासाठी हाता पायांवर जखम झालेल्या माणसाची निवड करू नये कारण जखमे वाटे या विषारी औषधांचा शरीरामध्ये शिरकाव होऊन धोका पोहोचण्याचा संभव असतो.

६. फवारण्याचे मिश्रण किंवा उंदरांसाठी विषारी गोळ्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मातीची भांडी, रिकामे डबे अगर बाटल्या घरगुती कामासाठी (उदा.गोडतेल,पाणी इत्यादी साठी) न वापरता जमिनीमध्ये खोल पुराव्यात व धातुची भांडी साबण, सोडा व माती यांनी स्वच्छ धुवून घ्यावीत.

७. डब्यातून अगर बाटलीतून औषध काढताना त्यात नळी घालून तोंडाने वर ओढू नये. शक्यतो हातात रबरी हा‍तमोजे घालावेत (Precautions While Spraying Pesticides).

८. औषधांचे मिश्रण तयार करण्याचे अथवा फवारण्याचे काम चालू असताना खाणे, पिणे अगर धूम्रपान करू नये. नाहीतर औषध पोटात जाण्याचा संभव असतो. तसेच औषध फवारण्याच्या नळीतील घाण अगर कचरा फुंकून साफ न करता तो तारेने साफ करावा.

९. कीटकनाशक औषध तयार करताना व फवारतांना जरुरी ते शरीर संरक्षक कपडे व उपकरणे वापरावीत.

१०. शक्यतो पिकांवर फवारण्याचे मिश्रण हाताने न ढवळता ते ढवळण्यासाठी लाकडी काठी वगैरे वापरावी (Precautions While Spraying Pesticides).

११. भाजीपाला अगर जनावरांचा (कोबी, लसुण व गवत) वगैरे तत्सम पिकांवर औषध फवारल्यानंतर त्या भाज्या अथवा चारा किमान १५ दिवस तरी खाण्यामध्ये येऊ नये, त्याप्रमाणे स्वच्छ धुवून घ्याव्यात.

१२. शक्यतो औषध फवारण्याचे काम एकाच माणसाकडून सतत करून न घेता पाळी पाळीने करून घ्यावे. त्याप्रमाणे दुपारच्या वेळी हे काम न करता सकाळी व संध्याकाळी करावे.

१३. औषध फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी म्हणजे हे औषध पिकांवर चांगले पसरते. तसेच नाका-तोंडावाटे हे औषध पोटात जाण्याचा संभव टळतो.

१४. फवारण्याचे काम पूर्ण झाल्यावर अंगावरील कपडे तसेच सर्व अंग साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे.

१५. पेरणीनंतर कीटकनाशक व बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेले बियाणे शिल्लक राहिल्यास खाण्याकरिता वापरू नये. ते जाळून अथवा जमिनीत पुरून टाकावे.

फवारणी करणाऱ्या व्यक्तीने लक्षात घ्यावयाच्या गोष्टी (Precautions to be Taken By Person)

  • औषध फवारणी किंवा धुरळणी झाल्यावर साधन स्वच्छ करून तपासणी करावी. साधनातील औषध पूर्णपणे निघून गेले आहे, याची खात्री करावी, कारण शिल्लक राहलेल्या औषधापासून विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
  • शेतावर औषध फवारण्यासाठी जात असताना साधनांचे सुटे भाग आणि हत्यारे बरोबर घ्यावीत म्हणजे औषधाचा वापर चालू असताना साधनामध्ये काही दोष निर्माण झाल्यास त्याची दुरूस्ती करता येणे शक्य होईल.
  • सामान्यत: वॉशर्स, नोझल, रबरी पाईप्सच्या क्लिप्स, स्पार्क प्लग्ज, स्क्रू ड्रायव्हर्स, पाने इत्यादी बरोबर घ्यावेत.
  • जेव्हा अनेक साधने एकाच वेळी शेतात वापरली जातात, त्या वेळेला एक-दोन जादा साधने शेतावर नेणे आवश्यक ठरते. असे केल्याने एखादे साधन बंद पडल्यास वेळेचा अपव्यय होत नाही.
  • औषध फवारण्यासाठी गळक्या साधनांचा वापर करू नये (Precautions While Spraying Pesticides). अशा साधनांमुळे फवारणी करणार्‍याला इजा होऊ शकते. तसेच पि‍कालाही धोका संभवतो.
error: Content is protected !!