Predatory Insects: पिकांचे मित्र, किडींचे कर्दनकाळ – परभक्षी कीटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: परभक्षी कीटकांचा (Predatory Insects) एकात्मिक कीड नियंत्रणात जैविक कीड नियंत्रण (biological Pest Control) पद्धती म्हणून वापर केला जातो. तसेच सेंद्रिय पद्धतीने शेती करताना परभक्षी कीटकांना विशेष महत्व आहे. कारण हे परभक्षी कीटक मुख्य पिकांना नुकसान न करता हानिकारक किडींचे नियंत्रण करतात. हे परभक्षी कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक परभक्षी अनेक किडींचा नायनाट करतात. आजच्या लेखात जाणून घेऊ या परभक्षी कीटक (Predatory Insects) आणि त्यापासून होणार्‍या किडींचे नियंत्रण (Pest Management).

विविध पिकांसाठी परभक्षी कीटक (Predatory Insects)

लेडी बर्ड बीटल (ढाल किडे): हे परभक्षी कीटक पिकांवरील रस शोषणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व पिठ्या ढेकूण इ. नुकसानकारक किडींवर उपजीविका करतात. मका, ज्वारी, कापूस, ऊस, कडधान्ये, भाजीपाला इ. पिकांवर हे मित्र कीटक मोठ्या प्रमाणावर आढळतात.

प्रसारण: 1000/एकर

ग्रीन लेस वींग/ क्रायसोपा (हिरवा जाळीदार पतंग): या कीटकाच्या अळी व प्रौढ अवस्था मावा, पांढरी माशी, तुडतुडे, कोळी, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, खवले कीड यांच्या सर्व अवस्था व बोंडअळीची अंडी, प्रथमावस्थ्येतील अळ्या खातात. हे कीटक कापूस, मका, कडधान्ये व भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात.

प्रसारण: 2000 अंडी/एकर किंवा 4000 अळ्या/एकर

प्रेयिंग मँटीड (प्रार्थना कीटक): हे कीटक निसर्गतः आढळून येतात. हे कीटक पतंगवर्गीय किडींच्या अळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात.

डीफा अफिडीवोरा (कोनोबाथ्रा): हे मित्रकीटक जैविक कीड नियंत्रणातील उत्कृष्ट उदाहरण आहेत. उसावरील लोकरी माव्याच्या जैविक नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो. पूर्ण विकसित अळी 300 पेक्षा अधिक मावा किडी खाते. एक अळी पानावरील लोकरी मावा 3 ते 5 दिवसांत खाऊन फस्त करते.

प्रसारण: लोकरी माव्याच्या प्रादुर्भाव दिसून येताच 50 कोष/गुंठा किंवा 400 अळ्या प्रति एकर सोडाव्यात.

परभक्षी कोळी (एम्बलीसियस): हे मित्रकीटक भाजीपाला, फुलझाडे, फळझाडे व पॉली-हाऊसमधील पिकांवरील नुकसान करणाऱ्या लाल कोळी व दोन ठिपक्यांच्या कोळी नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

सिरफिड माशी: या परभक्षी कीटकांची अळी मुख्यतः मावा या रस शोषक किडीला फस्त करतात. या किटकांचा उपयोग ऊस, ज्वारी, मका, भाजीपाला पिकांमध्ये होतो. हे मित्रकीटक निसर्गतः मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.

तणांवरील परभक्षी किटक (Predatory Insects)

निकोचिटानस सोंड कीडे: प्रौढ कीटक जलपर्णीच्या शेंड्यांमध्ये जाऊन आतील गर खातात व पानांना छिद्रे पाडतात. हे किडे जलपर्णीग्रस्त तलावात प्रादुर्भावानुसार सोडावेत.

झायगोग्रामा भुंगेरे: हे भुंगेरे गाजर गवतावर राहून कळ्या, पाने, फुले खातात.

error: Content is protected !!