Preet Tractors : शेतकऱ्यांसाठी 100 एचपीचा तगडा ट्रॅक्टर; कमी डिझेलमध्ये करतो अधिक काम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या मोठ्या क्षमतेच्या अत्याधुनिक ट्रॅक्टर निर्मितीमध्ये प्रीत ट्रॅक्टर (Preet Tractors) निर्माता कंपनी प्रामुख्याने ओळखली जाते. कंपनीने देशातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कमी इंधनात अधिक काम करणारे आणि पॉवरफुल ट्रॅक्टर निर्माण केले आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील आपल्या अधिकच्या जमिनीसाठी एखादा पॉवरफुल ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर प्रीत कंपनीचा ट्रॅक्टर 100 एचपी इतकी तगडी पॉवर असलेला ‘प्रीत 10049 4डब्ल्यूडी’ ट्रॅक्टर हा उत्तम पर्याय ठरणार आहे. आज आपण प्रीत कंपनीच्या ‘प्रीत 10049 4डब्ल्यूडी’ ट्रॅक्टरबद्दल (Preet Tractors) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…

‘प्रीत 10049 4डब्ल्यूडी’ ट्रॅक्टरबद्दल (Preet Tractors Powerful For Farmers)

प्रीत कंपनीचा ‘प्रीत 10049 4डब्ल्यूडी’ हा ट्रॅक्टर (Preet Tractors) 4087 सीसी क्षमतेसह 4 सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. या ट्रॅक्टरला वॉटर कुलिंग इंजिन देण्यात आले आहे. जे 100 एचपी पॉवर जनरेट करते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ड्राय टाइप एयर फिल्टर दिलेला आहे. या शक्तिशाली ट्रॅक्टरची कमीत कमीत पीटीओ पॉवर क्षमता 86 एचपी इतकी असून, या ट्रॅक्टरचे इंजिन 2200 आरपीएमची निर्मिंती करते. कंपनीने आपल्या या शक्तिशाली ट्रॅक्टरला 67 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. या ट्रॅक्टरला कंपनीकडून 2400 किलो वजन उचलण्याची क्षमता देण्यात आली आहे. तर या ट्रॅक्टरचे एकूण वजन हे 2800 किलो इतके आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 2340 एमएम व्हीलबेससह 470 एमएम ग्राउंड क्लीयरन्समध्ये तयार केले आहे.

काय आहेत फीचर्स?

  • प्रीत कंपनीच्या ‘प्रीत 10049 4डब्ल्यूडी’ या ट्रॅक्टरला पॉवर स्टीयरिंग देण्यात आली आहे.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 12 तर मागील बाजूस 12 रिव्हर्ससह गिअरबॉक्स दिलेला आहे.
  • आपल्या या शक्तिशाली ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 0.65 ते 40.25 किमी प्रति तास तर मागील बाजूस 0.55 से 30.79 किमी प्रति तास इतका वेग दिलेला आहे.
  • या ट्रॅक्टरला तुम्हाला ड्युअल क्लचसह सिंक्रोमेश टाइप ट्रांसमिशन देण्यात आले आहे.
  • ‘प्रीत 10049 4डब्ल्यूडी’ ट्रॅक्टरला ऑइल इमर्जड ब्रेक्स देण्यात आले आहे.
  • हा ट्रॅक्टर तुम्हाला फोर व्हील ड्राइवमध्ये उपलब्ध आहे.
  • कंपनीने आपल्या या शक्तिशाली ट्रॅक्टरला पुढील बाजूस 12.4 x 24 / 14.9 x 24 आकारात तर मागील बाजूस 18.4 X 30 / 18.4 X 34 आकारात टायर दिलेले आहे.

किती आहे किंमत?

प्रीत कंपनीने ‘प्रीत 10049 4डब्ल्यूडी’ या आपल्या शक्तिशाली ट्रॅक्टरची शोरूम किंमत 18.80 लाख ते 20.50 लाख रुपये इतकी निर्धारीत केली आहे. विविध राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स वेगवेगळा असल्याने त्याची किंमत देखील वेगवेगळ्या राज्यात वेगळी राहू शकते.

error: Content is protected !!