Preparation For Kharif Season: शेतकऱ्यांनो, शेतात खरीप पूर्व तयारी करताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात (Preparation For Kharif Season) पिकांचे चांगले आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठीपूर्व नियोजन खूप महत्त्वाचे आहे. शेतीतील खर्च कमी करण्यासाठी शेतात जमिनीची तयारी (Land Preparation) पासून व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या खरीप पूर्व तयारी (Preparation For Kharif Season) करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्या.  

जमिनीनुसार पिकांचे नियोजन (Preparation For Kharif Season)

जमिनींच्या प्रकारानुसार पिकांचे नियोजन महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा जमीन एकसारखी दिसत असली तरी तिच्या गुणधर्मात खूप विविधता असते. मुख्यतः तिची खोली कमी-अधिक असल्यामुळे उत्पादन क्षमतेत खूप फरक असतो.

  • कपाशीचे पीक खोल जमिनीत घ्यावे कारण कापसाची मुळे खूप खोलवर वाढतात आणि दीर्घ कालावधीचे ते पीक आहे.
  • तूर, सोयाबीन या पिकांसाठी मध्यम ते खोल जमीन फायद्याची ठरते.
  • ज्वारी, सूर्यफूल, बाजरी, मका आदी पिकांसाठी मध्यम खोलीची जमिनीची निवड करावी.
  • उथळ जमिनीवर अतिशय कमी कालावधीची पिके उदा. मूग, उडीद ही पिके घ्यावीत म्हणजे त्यांची मुळे जमिनीच्या वरच्या थरातच योग्य वाढू शकतात.

सेंद्रिय खते (Organic Fertilizers)

जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी नियमित सेंद्रिय खतांचा वापर होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतीची मशागत करीत असताना चांगले कुजलेले शेणखत किमान पाच टन प्रति हेक्‍टरी वापरावे. त्यामधून जमिनीस सेंद्रिय पदार्थ, इतर अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये  प्राप्त होतात. यासाठी गांडूळ खत, कंपोस्ट, हिरवळीची खते यांचा वापर करावा. शेतातील काडीकचरा वापरून उत्तम कंपोस्ट तयार करता येते.

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन (Integrated Nutrient Management)

पिकांच्या चांगल्या वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावतात. शिफारशीत अन्नद्रव्यांच्या मात्रा एवढीच खते पिकाला देणे गरजेचे आहे. यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. जमिनीची सुपीकता चांगली असल्यास ही शिफारशीत मात्रा काही अंशी कमी करता येते. त्यामुळे खर्चात बचत होण्यास मदत होते. अन्नद्रव्यांच्या नियोजनामध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे उपलब्ध असलेले शेणखत वापरा. शेणखताची टंचाई असल्यास आलटून-पालटून का होईना, प्रत्येक शेतास शेणखत तीन वर्षांतून तरी एकदा मिळेल

शेतातील मातीचे परीक्षण करण्यासाठी उन्हाळ्यातच नियोजन (Preparation For Kharif Season) करून प्रातिनिधीक नमुना घेऊन परीक्षण करून घ्यावे. माती परिक्षणाचा अहवाल नीट समजून घ्यावा. त्यानुसार खताचे नियोजन आधीच करून घ्यावे. गंधक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची गरज आपल्या शेतास आहे का याची खात्री करून घ्यावी.

असे नियोजन करावे. जेणेकरून आपण जी रासायनिक खते वापरणार आहात, त्यांचा योग्य कार्यक्षम वापर पिकांसाठी होऊन फायदा होईल. कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खत इत्यादीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त युरियाचा वापर किंवा फक्त डीएपीचाच वापर बऱ्याचदा होताना दिसतो. किंबहुना तीनही मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा संतुलित पुरवठा महत्त्वाचा असतो.

पीक फेरपालट (Crop Rotation)

जमिनीच्या आरोग्यासाठी पिकात विविधता महत्त्वाची आहे. कडधान्यवर्गीय पिकांचा जमिनीस फायदा होतो. फक्त तृणधान्य आधारित पीक पद्धती सतत घेतल्यास जमिनीतील सुपीकतेचा र्‍हास होतो. सोयाबीन, तूरसारख्या पिकांचा पालापाचोळा जमिनीस सेंद्रिय कर्ब मिळवून देतो. कपाशीसारख्या पिकात फेरपालट गरजेचे असते. त्यासाठी कपाशीसारख्या पिकानंतर सोयाबीन असे नियोजन आधीच करण्याची गरज आहे. सोयाबीन – तूर आंतरपीक ही पद्धत अतिशय महत्त्वाची आढळून येत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पिकांचे आणि पीक पद्धतींचे नियोजन (Preparation For Kharif Season) करावे.

रासायनिक खतास पूरक हिरवळीच्या खतांचा वापर (Green Manure)

हिरवळीच्या खतासाठी वापरण्यात येणाऱ्या पिकांचा वापर म्हणावा त्या प्रमाणात केला जात नाही. त्यासाठी हंगाम वाया जातो अशी धारणा असते; परंतु हिरवळीच्या पिकांची उदा. धेंचा बोरू यांची मुख्य पिकासोबत उदा. कपाशीच्या दोन ओळींत एक ओळ अशी लागवड करता येते. अवघ्या 35 ते 45 दिवसांत मोठ्या प्रमाणात तयार होणारा ‘बायोमास’ जमिनीत गाडल्यास मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ मिळतो. यामुळे जमिनीचे गुणधर्म सुधारतात, खतांची बचत होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता येत नाही. सुपीकता टिकवून ठेवता येते. जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन होते. जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात. सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे रासायनिक खताच्या वापरात बचत होते. गिरीपुष्प मूग, उडीद, चवळीसारख्या पिकांचा देखील हिरवळीचे खत म्हणून वापर करता येतो.

पीक अवशेषांचा पुनर्वापर (Reuse Of Crop Residues)

पिकांच्या अवशेषामधील अन्नद्रव्यांचा जमिनीत पुनर्वापर करून साखळी पद्धतीने त्यांचे संवर्धन करता येते आणि त्यातून जमिनीस सेंद्रिय पदार्थ प्राप्त होतो. या अवशेषांमध्ये बऱ्याच प्रमाणात अन्नद्रव्ये असतात. रासायनिक खतांना पूरक म्हणून त्यांचा शेतीत वापर वाढविण्याची गरज आहे (Preparation For Kharif Season).

माती परिक्षणाचे नियोजन (Soil Testing)

जमिनीचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि जमिनीचे शाश्‍वत शेतीसाठी संवर्धन होईल या दृष्टिकोनातून खरिपाच्या नियोजनाची (Preparation For Kharif Season) गरज आहे.

error: Content is protected !!