Production Costs : शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज – नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशात अन्नद्यान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रति एकरी खर्च (Production Costs) हा मोठया प्रमाणात करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे (Production Costs) अत्यंत गरजेचे आहे. असे केंद्रीय दळणवळण आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते नवी दिल्ली येथे ‘मिलियनेयर फार्मर्स ऑफ इंडिया अवार्ड्स 2023’ या कार्यक्रमात बोलत होते.

देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी (Production Costs) सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. ज्यात सरकार काही प्रमाणात यशस्वीही झाले आहे. मात्र शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या आहे की त्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. मागील दहा वर्षांमध्ये कीटकनाशनकांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. बांधकाम क्षेत्रातही सिमेंटचे दर अनेक पटीने वाढले. मात्र गहू आणि तांदळाच्या दरात झालेली वाढ ही खूप नगण्य स्वरूपात आहे. त्यामुळे आपल्याला देशातील शेतकऱ्यांची प्रगती घडवून आणायची असेल तर त्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर आणि त्यासाठीचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे. असेही गडकरी यावेळी म्हणाले आहे.

ड्रोन वापरासाठी फ्लेक्स तंत्रज्ञान (Production Costs Of farmers)

सध्या अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे देशातील शेती क्षेत्रात नव्याने दाखल होत असलेल्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना उत्पादन घेणे सुलभ होणार आहे. आज मी ज्या गाडीतून आलोय, ती फ्लेक्स तंत्रज्ञानावर आधारित आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बायो इंधनावर ती चालते. त्यामुळे ड्रोनचा वापरही याच तंत्रज्ञानावर केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन वापराचा खर्च कमी येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘इंधनदाता’ ओळख निर्माण होईल

अन्नदाता ओळख असलेले देशातील शेतकरी इंधनदाता म्हणून म्हणून ओळखले जातील. त्यामुळे आगामी काळात 60 टक्के वाहने इथेनॉलवर आणि 40 टक्के वाहने इलेक्ट्रिकआधारित होतील. आणि देशातील पेट्रोल दर 15 लिटरपर्यंत घसरतील. असे सूतोवाचही गडकरी यांनी यावेळी केले आहे.

error: Content is protected !!