यंदा बेदाण्यांचे उत्पादन जास्त; कोल्ड स्टोअर फुल झाल्याने बेदाणे ठेवायचे कुठे हा प्रश्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्षापासून बेदाणा निर्मिती प्रक्रिया केली जाते. मात्र यंदा बेदाण्याचे उत्पादन अधिक झाल्याने त्याचा थेट परिणाम दरावर होऊन किमतीत घसरण झालेली पहायला मिळत आहे . यापूर्वी बेदाण्यांचे दर २०० ते २२५ होते परंतु यंदा मात्र यामध्ये घट झाली असून याच किंमती आता १२० रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. भाव घसरल्याने शेतकरी हेच बेदाणे कोल्ड स्टोअरेजला साठवण्यासाठी देऊ लागले आहेत. राज्यात सध्या २०० बेदाणे स्टोअरेज करून ठेवले आहेत. जवळपास सर्वच स्टोअरेज बेदाण्यांनी फुल झाले आहेत.

कोल्ड स्टोअर फुल झाल्यामुळे आता तयार झालेला बेदाणा माल ठेवायचा कुठे आणि मालाचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उभा आहे. पंढरपूर येथे कोल्ड स्टोअरेजच्या बाहेर कर्नाटकहून अधिक माल आला. तसेच सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून अधिक बेदाणा येत आहे. याशिवाय ४० टक्के बेदाणा मालावर प्रेसेसिंग होत आहे. तयार मालाला जागा नसताना नवीन माल कुठे घेऊन जायचा याबाबत शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिला आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला कृषी प्रक्रिया, फलोत्पादन, शेती प्रक्रिया व्यवसाय यांविषयी सखोल ज्ञान आणि सल्ले हवे असतील तर आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला घसरबसल्या शेतीच्या निगडित सर्व गोष्टी, कृषी योजना, त्यासाठी लागणारे अनुदान याबाबत सर्व सुविधा मिळतील. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा आणि सर्व सुविधांचा लाभ घ्या

बेदाणे उत्पादनासाठी किती खर्च येतो

एक किलोचे बेदाणे बनवण्यासाठी शेतकऱ्याला ९० ते ९५ रुपये खर्च येतो. त्यानंतर कोल्ड स्टोअरेजमध्ये माल ठेवण्यासाठी ५० रुपये खर्च येत असून मालाचा इन्शुरन्स, १८ % जीएसटी (GST) हमाली आणि इतर खर्च शेतकऱ्याला भरावा लागतो. सध्या या मालाला फक्त १०० ते १२५ भाव असल्याने उर्वरित खर्च यामधून भागणे शक्य नाही

error: Content is protected !!