Progressive Farmer : दुष्काळी भागात द्राक्ष, डाळिंबातून साधली प्रगती; अनेक पुरस्कारांनी आहे सन्मानित!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये पिके घेताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना (Progressive Farmer) करावा लागतो. मात्र, अपयशातून खचून न जाता शेतकरी पुन्हा नव्याने उभारी घेत असतात. आज आपण अशाच एका दुष्काळी भागातील शेतकऱ्याच्या यशस्वी द्राक्ष आणि डाळिंब शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. सचिन सांगळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कुरवली गावचे रहिवासी आहे. त्यांनी आधुनिक साधनांच्या मदतीने द्राक्ष आणि डाळिंब पिकातून (Progressive Farmer) आपली प्रगती साधली आहे.]

2008 पासून द्राक्ष शेती (Progressive Farmer Success Story)

सातारा जिल्ह्यातील फलटण हा भाग तसा काहीसा दुष्काळी प्रदेश आहे. शेतकरी सचिन सांगळे (Progressive Farmer) यांनी काही दिवस मोलमजुरीने दिवस काढले. घरची वडिलांकडून मिळालेली जमीन तसेच त्यांनी स्वकर्तृत्वावर काही जमीन विकत घेतली. अशा त्यांच्याकडून एकूण सध्या 17 एकर जमीन आहे. ज्यातील काही जमिनीमध्ये सुरुवातीला 2008 पासून द्राक्ष बाग लावली. याच द्राक्ष बागेच्या जोरावर त्यांनी शेतीवरील कर्जफेड केली. तसेच शेतीमध्ये अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी त्यांनी केल्या. सध्या ते आपल्या शेतीमध्ये डाळींब आणि द्राक्ष पीक घेत आहे.

‘या’ द्राक्ष वाणांची लागवड

मागील काही वर्षांमध्ये त्यांनी आपल्या दोन्ही पिकांमध्ये हातखंडा निर्माण केला आहे. सतरा एकरांतील द्राक्ष बागेत व्हाइट व ‘कलर’ मिळून नानासाहेब पर्पल, कृष्णा, माणिक, चमन, रेड ग्लोब हे वाण घेत आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने त्यांच्या द्राक्ष बागेची छाटणी होते. फळांचा ‘सनबर्निंगा’पासून बचाव करण्यासाठी बागेवर प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर होतो. याशिवाय ते नाशिक जिल्ह्यातून मजूर उपलब्ध करतात.

किती मिळते उत्पादन

शेतकरी सचिन सांगळे सांगतात, आपल्याला रंगीत द्राक्षांचे एकरी 10 टन, व्हाइट द्राक्षांचे एकरी 13 टनांपर्यंत उत्पादन मिळते. यात प्रामुख्याने रंगीत द्राक्षांना प्रति किलो 60 पासून 110 रुपयांपर्यंत, तर व्हाइट द्राक्षांना 30 ते 90 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. काही मालाची निर्यातदारांमार्फत रशिया, दुबई, मलेशियाला निर्यात केली जाते. दक्षिणेकडील राज्यातील व्यापारीही जागेवरून खरेदी करतात. यंदा त्यांनी किलोला 97 रुपये दर देऊ केला आहे.

डाळिंबाचीही आदर्श शेती

द्राक्षाप्रमाणेच डाळिंबाचीही शेतकरी सचिन सांगळे आदर्श शेती (Progressive Farmer) आहे. पहिली जुनी बाग काढून अलीकडील वर्षात साडेचार एकरांत नवी बाग (भगवा वाण) लावली आहे. डाळिंबाच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून एकरी दहा टनांपर्यंत उत्पादकता मिळवली आहे. जागेवर प्रति किलो 100 ते कमाल 200 रुपये तर सरासरी 120 रुपये दर मिळतो आहे. डाळिंबातही झाडांवर नेटचा वापर होतो. त्यातून ‘सनबर्निंग’ टाळले जाऊन एकरी 80 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचा फायदा होत असल्याचे शेतकरी सचिन सांगळे सांगतात.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

शेतकरी सचिन सांगळे यांची शेतीतील यशाची दखल घेऊन, राज्य सरकारने 2016 साली उद्यान पंडित त्यांना पुरस्काराने गौरविले आहे. याशिवाय यंदाच्या वर्षी 2021 चा कृषिभूषण पुरस्कार जाहीर देखील त्यांना प्राप्त झाला आहे. इतकेच नाही तर ‘यशवंत’, सेवागिरी, ‘शरद पवार’ आदी कृषी प्रदर्शनांमध्ये आदर्श शेतकरी म्हणून देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

error: Content is protected !!