Pulses Import : अर्जेंटिनाहून देशात तूर, उडीदाच्या आयातीची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मोझांबिक, मलावी आणि म्यानमार (Pulses Import) या देशांसोबत कडधान्य (तूर, उडीद) आयातीसाठी करार केल्यानंतर, भारताने आता दक्षिण अमेरिकी देश असलेल्या अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून कडधान्य आयात (Pulses Import) करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यामुळे आता या दोन देशांमधून भारतात विना निर्यात बंधनांसह मोठ्या प्रमाणात तूर आणि उडीद यांची आयात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता आगामी काळात देशातील तूर आणि उडीद दरांवर याचा दबाव पाहायला मिळू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या जातीच्या कडधान्यांच्या (तूर, उडीद) आयातीसाठी (Pulses Import) अर्जेंटिनाच्या वाणिज्य अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेवेळी अर्जेंटिनाने भारताला तूर आणि उडीद देण्यासाठी होकार दिला आहे. भारतीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी अर्जेंटिनाचे राजदूत ह्यूगो जेवियर गोबी यांच्यामार्फत ही चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. तर अलीकडेच ब्राझीलचे शिष्टमंडळाने भारताला भेट दिली होती. या भेटीत डाळींच्या आयतीबाबत कृषिमंत्रालकडून चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून पुन्हा ब्राझीलशी डाळ आयातीसाठी संपर्क करण्यात आला आहे.

मोझांबिकमधून आयात ठप्प (Pulses Import In India)

मोझांबिक या देशातून भारताला तूर आयात पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे आगामी काळात मोझांबिकवर तूर आयातीसाठी अवलंबून राहावे लागू नये, म्हणून केंद्र सरकारने अर्जेंटिना आणि ब्राझील या देशांसोबत ही चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यापूर्वी भारताने 2016 मध्ये मोझांबिक या देशासोबत पाच वर्षांसाठी वार्षिक 0.2 दशलक्ष टन तूर आयातीसाठी सामंजस्य करार केला होता. या कराराला सप्टेंबर 2021 मध्ये पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

यावर्षी झालीये इतकी आयात
यावर्षी भारताने 2.13 दशलक्ष टन कडधान्ये (तूर,उडीद, हरभरा) आयात केली आहेत. यात प्रामुख्याने 1.08 दशलक्ष टन मसूर, 0.62 दशलक्ष टन तूर आणि 0.42 दशलक्ष टन उडीद आणि हरभरा आयात केला आहे. ही आयात भारताने प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, कॅनडा, म्यानमार, मोझांबिक, टांझानिया, सुदान आणि मलावी या देशांकडून केली आहे.

error: Content is protected !!