Pulses Import : कडधान्यांच्या आयातीत 31 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आर्थिक वर्षात कडधान्यांच्या आयातीत (Pulses Import) मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2023-24 मध्ये कडधान्यांची आयात ही जवळपास 3 दशलक्ष टनांपर्यंत पोहचू शकते. जी मागील आर्थिक वर्षात 2.29 दशलक्ष टन इतकी नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी कडधान्यांच्या आयातीत 31 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचानालयाच्या (डीजीएफटी) आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात देशात एप्रिल-डिसेंबर या कालावधीत आतापर्यंत 1.96 दशलक्ष टन कडधान्याची आयात (Pulses Import) झाली आहे. मूल्याचा विचार करता ही आयात 14,057 कोटींची झाली आहे. यामध्ये मसूर आयात ही 10 लाख टन इतकी झाली आहे. दरम्यान, 2017-18 मध्ये भारतात विक्रमी 6.5 दशलक्ष टन इतकी कडधान्यांची आयात करण्यात आली होती. त्यावेळी पिवळ्या वाटाण्याची आयात मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र नंतरच्या काही वर्षांमध्ये कडधान्यांची आयात घटली होती. आता यावर्षी कडधान्यांची आयात पुन्हा 31 टक्क्यांनी वाढली असल्याचे डीजीएफटीच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

पूर्णतः आयातीवर अवलंबून (Pulses Import Increase By 31 Percent)

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी देशातील हरभरा उत्पादन चागंले राहिले होते. मात्र मुगाच्या उत्पादनात घट पाहायला मिळाली होती. त्यातच यावर्षी तूर, उडीद, मसूर या कडधान्याची सर्व देशांतर्गत गरज ही आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहे. त्यामुळे यावर्षी कडधान्यांच्या आयातीत वाढ होऊन ती 3 दशलक्ष टन इतकी नोंदवली जाण्याची शक्यता आहे.

दर नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न

देशात एल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. ज्यामुळे देशातंर्गत कडधान्य उत्पादनावर त्याचा परिणाम झाला असून, कडधान्य आधारित डाळींच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे केंद्र सरकारकडून बाहेरील देशांमधून मोठ्या प्रमाणात कडधान्यांची आयात केली जात आहे. याशिवाय केंद्र सरकारने डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पिवळा वाटाणा, मसूर, तूर आणि उडीद यांसह अन्य कडधान्यांची आयात विना शुल्क करण्यास मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

error: Content is protected !!