Pune News : पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, भात लावणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. तसेच, या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर देखील आला आहे. परंतु, पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला असून भात लावणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यात भात लावणीसाठी पुरेसा पाऊस झाल्यामुळे भात लावणीच्या कामांना आला वेग आला आहे.

मागच्या अनेक दिवसापासून शेतकरी पावसाची वाट पाहत होते. मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र सध्या मागच्या काही दिवसापासून राज्यासह पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात लावणी सुरु केली आहे. (Pune News)

पुण्याच्या भोर तालुक्यातील 60 टक्के शेतकऱ्यांची भात लावणीची कामं पूर्ण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भात लावणी करताना उत्साह वाढावा, एकमेकांना स्फूर्ती मिळावी यासाठी शेतकरी समूहाने गाणी म्हणताना दिसत आहेत. सध्या भात लावणी करताना सर्वत्र भलरी गीतांचे स्वर ऐकू येत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतांमध्ये भात लावणीचे काम वेगाने सुरु आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतीविषयक गोष्टींची अगदी सोप्या भाषेत माहिती जाणून घ्यायची असेल तर लगेच प्ले स्टोअर वर जाऊन आपले hello krushi हे ॲप इंस्टाल करा यामध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व माहिती मिळेल. यामध्ये बाजारभाव, हवामान अंदाज, सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी अशी अनेक माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इंस्टाल करा.

error: Content is protected !!