Pune News : शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक क्षण अनुभवायला मिळतात. बऱ्याच गोष्टी विद्यार्थी स्वतः करून शिकत असतात. सध्या देखील पुण्याच्या मावळ तालुक्यातील येवलेवाडी शाळेच्या विध्यार्थ्यांनी भात लागवडीचा आनंद घेतला आहे. भात लागवड करताना पाहणं आणि (Pune news) प्रत्यक्षात लागवड करणं यामध्ये खूप फरक असतो. हाच फरक प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी विद्यार्थी थेट भात खाचरात उतरले.
याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकातून भात लागवडीचे ज्ञान घेतले मात्र त्यांना प्रत्यक्ष लागवड करून हा अनुभव घ्यायचा होता. त्यामुळे भात लागवडीसाठी शालेय गणवेशात थेट भात खाचरात उतरल्याचे पाहायला मिळाले. (Pune news)
मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांना गोष्टी प्रात्यक्षिक करुनच शिकवायला हव्या त्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना बंद खोल्यांच्या शाळेच्या बाहेर काढणं गरजेचं असतं. बळीराजा शेतामध्ये कसा राबतो, हे मुलांना समजलं पाहिजे आणि आपल्या घरात भात कसा येतो, या गोष्टी मुलांना समजल्या पाहिजेत. यासाठी मुलांना थेट भात खाचरात घेऊन आल्याचं शिक्षकांनी सांगितलं आहे.
शिक्षकांची ही शक्कल पाहून विद्यार्थीही आनंदी झाले. विद्यार्थ्यांना देखील यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. सध्या याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.
‘या’ अँपबद्दल माहिती आहे का?
शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक खास अँप आणले आहे. Hello Krushi असं या अँपच नाव आहे. या अँपमध्ये तुम्हाला रोजचा बाजारभाव, सरकारी योजना, हवामान अंदाज पशूंची खरेदी विक्री, त्याचबरोबर जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही अगदी मोफत मिळवू शकता. त्यामुळे लगेचच हे अँप डाउनलोड करा.