Pune News : पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनीमध्ये पाणी सोडून पिकांची तहान भागवावी; ‘या’ आमदाराने केली मोठी मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : सध्या राज्यातील अनेक भागात पावसाचे दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. आगामी काळात पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पावसाने चांगलीच दडी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांची आणि पिकांची तहान भागवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणात (Ujani dam) पाणी सोडण्याची मागणी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केली आहे.

सध्या राज्यासह सोलापूर मध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. पंढरपूर आणि सांगोला या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नीरा उजवा कालव्यातून पाणी पाळी देण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु केले होते. यामध्ये शहाजीबापू पाटील हेदेखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन नीरा उजवा कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी पाळी सोडण्याची मागणी केली. आणि त्यानंतर उपोषण थांबवण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असून उजनी धरणा मधून सोलापूर जिल्ह्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी एक पाण्याची पाळी आणि सोलापूरसह पंढरपूर, सांगोला आणि इतर नगरपालिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उजनीतून पाणी द्यायचे झाल्यास यासाठी 14 टीएमसी पाण्याची गरज आहे. मात्र सध्या उजनी मधील पाणी साठा पाहतात जर उजनी धरणातून एवढे पाणी सोडणे शक्य नसेल तर पुणे जिल्ह्यातील पाच धरणातून प्रत्येकी दोन टीएमसी आणि उजनीतून चार टीएमसी पाणी दिल्यास शेतकऱ्यांच्या सुकलेल्या पिकांची तहान भागेल आणि माणसांची देखील तहान भागेल असे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत.

दुष्काळ जाहीर करून मदत करावी

राज्याच्या विविध भागात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीरच होत चाललेला आहे. पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीमधील पीक जळू लागले आहे. तर पिण्याच्या पाण्याचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदाचा खरीप हंगाम वायाला गेल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहेत. अनेक नेत्यांनी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे.

error: Content is protected !!