Punganur Cow : अडीच फुटाची पंगानुर जातीची गाय; मोदींनीही केली तिची सेवा! वाचा वैशिष्ट्ये…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या निवासस्थानी गायींना चारा (Punganur Cow) घालत असल्याचा एक फोटो समोर आला आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी त्यांनी गायींना चारा घालत गोसेवा केली आहे. या फोटोमध्ये पंगानुर जातीच्या गायी दिसत आहेत. मात्र दिसायला बुटकी आणि आगळीवेगळी असलेली पंगानुर गायीची जात नेमकी कशी असते? या गायीच्या जातीचा इतिहास काय आहे? आणि ही गाय किती दूध देते? याबाबत आपण आज सविस्तरपणे (Punganur Cow) जाणून घेणार आहोत…

गायीची पंगानुर जात (Punganur Cow Breed Modi Served Her)

आंध्र प्रदेशच्या काकीनाडा येथील डॉ. कृष्णम राजू या पशुवैद्यकीय डॉक्टरने 14 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ही छोटी पंगानुर गायीची जात (Punganur Cow) विकसित केली आहे. ‘मिनिएचर पंगानुर’ असे नाव त्यांनी या जातीच्या गायीला दिले आहे. दिसायला सर्वात लहान गाय असल्याचा विक्रम ‘मिनिएचर पंगानुर’ या गायीच्या नावे आहे. या गायीची उंची केवळ अडीच फूट इतकी असते. सामान्यपणे यापूर्वी पंगानुर गाईची उंची साधारणपणे तीन से पाच फूट इतकी असायची. मात्र, डॉ. कृष्णम राजू यांनी विकसित केलेल्या या गायीची उंची ही केवळ अडीच फूट असल्याने, ती सर्वांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते.

2019 मध्ये ‘मिनिएचर पंगानुर‘ विकसित

डॉ. कृष्णम राजू यांच्या उपलब्ध माहितीनुसार, सामान्य पंगानुर ही गाय जेव्हा जन्माला येते. तेव्हा तिची उंची 16 इंच ते 22 इंच इतकी असते. मात्र आपण विकसित केलेली ‘मिनिएचर पंगानुर’ या गायीची जन्माला येते. तेव्हाची तिची उंची ही केवळ ७ इंच ते १२ इंच असते. पंगानुर ही गायीची 112 वर्षे जुनी जात आहे. मात्र डॉ. कृष्णम राजू यांनी जनुकीय बदल करून 2019 मध्ये ‘मिनिएचर पंगानुर ‘ ही पंगानुर गायीची लहान जात विकसित केली होती.

पंगानुर गायीचा इतिहास

इतिहासामध्ये वैदिक काळात वशिष्ठ आणि विश्वामित्र ऋषींच्या काळातही या पंगानुर जातीच्या गायी अस्तित्वात होत्या. मात्र हवामान बदलानुसार त्यांची उंची वाढत गेली. पूर्वी पंगानुर गायीची उंची अडीच ते तीन फूट असल्याने तिला ब्रह्म म्हटले जात असे. याशिवाय या जातींच्या गायींना विशेष धार्मिक महत्व होते. या जातीच्या गायीच्या दुधामध्ये ८ टक्के फॅट इतके मोठ्या प्रमाणात फॅट असते. सामान्य गायीच्या दुधामध्ये ते ३ ते ३.५ टक्के असते. त्यामुळे या गायीच्या दुधाला आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्व आहे.

किती दूध देते?

पंगानुर गायीचे सरासरी दूध उत्पादन दररोज 1 ते 3 लिटर इतके असते. मात्र या दुधाचा फॅट हा सामान्य गायीच्या दुधाच्या तुलनेत दुपटीने असतो. या जातीची गाय दिवसाला 5 किलो चारा खाते. या गायीला बकरीसारखा कमी चारा लागत असल्याने, तिचे दुष्काळातही संगोपन करणे सोपे असते. 2019 च्या पशु जनगनणेनुसार देशात सध्या केवळ 13 हजार 275 पुंगनूर जातीच्या गायी आहेत. पंगानुर गायीची किंमत साधारणपणे 30,000 ते 1,50,000 रुपयांपर्यंत असू शकते.

error: Content is protected !!