Rabi Crops Sowing : राज्यात फक्त इतकी टक्के झाली रब्बी पिकांची पेरणी; उत्पादन घटण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rabi Crops Sowing : राज्यात फक्त 28% रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. राज्यात यंदा पावसाची सरासरी कमी असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम रब्बी पिकांच्या पेरणीवर झाला आहे. त्यामुळे आगामी काळात रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकूणच काय तर शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे.

रब्बी पिकांच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता – Rabi Crops Sowing

महाराष्ट्रातील रब्बी पिकांचे क्षेत्र हे सरासरी ५३.९७ लाख हेक्टर आहे. परंतु १६ नोव्हेंबर पर्यंत १५.११ लाख हेक्टर क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली आहे. राज्यातील १७८ तालुक्यातील ९५९ मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र जरी 28 टक्के पर्यंत रब्बीची पेरणी झाली (Rabi Crops Sowing) असली तरी यापुढील काळात या पिकांना पुरेसे पाणी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. गहू, ज्वारी, हरभरा यासारख्या रब्बी पिकांच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे.

राज्यात 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत सरासरीच्या 86 टक्के पाऊस (928.8 मि.मी.) झाला आहे. रब्बीसाठी 58 लाख 76 हजार हेक्टर पेरणीचे नियोजन असून आत्तापर्यंत 28 टक्के पेरणी झाली आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणी मंदावली आहे. गतवर्षी याच सुमारास 13 लाख 50 हेक्टर पेरणी झाली होती. या वर्षी 15 लाख 11 हेक्टर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून 17 लाख 53 हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या सरासरीच्या 45 टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे.हरभऱ्याचे क्षेत्र 21.52 लाख हेक्टर असून यावर्षी 5.64 लाख हेक्टर म्हणजेच सरासरीच्या 26 टक्के पेरणी झाली आहे.

error: Content is protected !!