Rabi Onion Sowing: महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात रब्बी कांद्याच्या पेरणीत 10-15% घट होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही महिन्यांतील अनियमित पाऊस, कमी जलसाठ्याची पातळी आणि निर्यातीवरील निर्बंध यामुळे रब्बी कांद्याची पेरणी (Rabi Onion Sowing) 10 ते 15 टक्क्यांनी घटली आहे. रब्बी कांद्याची पेरणीचा कालावधी संपायला अजून काही दिवस बाकी आहेत. तरीही या हंगामात कांद्याच्या लागवड (Rabi Onion Sowing) क्षेत्रात एकरी 10-15 टक्के घट होण्याची शक्यता उद्योग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक या मुख्य कांदा उत्पादक राज्यांमध्ये रब्बी (हिवाळी) कांद्याची पेरणी 20% पर्यंत घसरली आहे. यामुळे मार्च-एप्रिलच्या आसपास अन्नधान्य महागाई उच्च पातळीवर जाऊ शकते, लोकसभा निवडणुकीच्या अगदी आधी, जेव्हा सरकारवर महागाई नियंत्रणात ठेवण्याचा दबाव असेल, त्यावेळी ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.  

क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सचे संचालक संशोधन पुशन शर्मा म्हणाले की, सध्याच्या पेरणीत काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते, तरीही, रब्बी कांदा लागवडीखाली क्षेत्रामध्ये 10% घट होऊन हंगाम संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

देशातील एकूण उत्पादनांपैकी सुमारे 70% कांदा रब्बी हंगामात होतो. या हंगामात उत्पादित केलेला कांदा जास्त काळ टिकतो. या कांद्याची टिकवण क्षमता खरीप कांद्याच्या तुलनेत सुमारे 5-7 महिने जास्त असते आणि मार्च ते सप्टेंबर या कालावधीत हा कांदा बाजारात उपलब्ध होतो.  त्यामुळे मागणी-पुरवठ्याची गती टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी रब्बी कांद्यावर असते.

प्रमुख कांदा उत्पादक राज्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये जल साठ्याची पातळी सध्या अत्यंत कमी आहे. रब्बी कांद्याला 12 ते 15 सिंचनाची गरज असते. त्यामुळे सिंचनाची शक्यता कमी झाल्याने शेतकरी रब्बी कांद्याची लागवड (Rabi Onion Sowing) करण्यात नापसंती दाखवत आहेत असे भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) म्हटले आहे

 

error: Content is protected !!