हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 च्या रब्बी हंगामात देशात आतापर्यंत 567.04 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी (Rabi Sowing) झाली आहे. देशातील एकूण सामान्य पेरणीच्या तुलनेत आतापर्यत ९० टक्के इतकी रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये गव्हाची 307.32 लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, ती देशातील एकूण रब्बी पिकांच्या पेरणीपैकी ९२ टक्के इतकी आहे. येत्या काळात तापमानात वाढ त्याचा यावर्षीच्या रब्बी पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम (Rabi Sowing) होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
हरभरा, मसूर लागवडीत घट (Rabi Sowing 567.04 Lakh Hectares)
कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत रब्बी पिकांची एकूण लागवड (Rabi Sowing) ही मागील वर्षीच्या समान तुलनेत होऊ शकेल. मागील वर्षी एकूण 343.23 लाख हेक्टरवर गहू पेरणी झाली होती. विशेष म्हणजे यावर्षी रब्बी पिकांमध्ये डाळवर्गीय पिकांची लागवड ८ टक्क्यांनी घटून, 128.54 लाख हेक्टर नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 139.98 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. यामध्ये प्रामुख्याने मसूर आणि हरभरा लागवडीत घट नोंदवली गेली आहे. यावर्षी 88.48 लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 98.01 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. यावर्षी 16.75 लाख हेक्टरवर मसूर लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 16.84 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती.
तेलबियांच्या लागवडीत वाढ
यावर्षीच्या रब्बी हंगामात धानाची 11.64 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 12.89 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. याशिवाय देशभरात यावर्षी 19.98 लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 20.35 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. मका लागवडीमध्ये यावर्षी ४ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली असून, यावर्षी 15 लाख हेक्टरवर मका लागवड (Rabi Sowing) झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 14.45 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. दरम्यान, यावर्षीच्या रब्बी हंगामात तेलबियांच्या लागवडीत वाढ नोंदवली गेली आहे. यावर्षी 99.11 लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 98.08 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. यामध्ये 91 हजार हेक्टरवर भूईमुग, तर मोहरी 73.06 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.