Rabi Sowing : ‘या’ राज्यांमध्ये गहू पेरणीत वाढ; ‘पहा’ देशात किती झालीये रब्बीची पेरणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबरच्या शेवटीपर्यंत देशातील रब्बी पिकांच्या लागवडीत (Rabi Sowing) बरीच वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 629.65 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 646.16 लाख हेक्टर इतकी नोंदवली होती. अर्थात यावर्षी आतापर्यंत रब्बी पिकांच्या पेरणीत केवळ तीन टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी झालेला सरासरी पाऊस आणि काही राज्यांमध्ये असलेली दुष्काळी परिस्थिती पाहता रब्बी पिकांच्या पेरणीत (Rabi Sowing) ही घट दिसून आली आहे.

गहू पेरणी जोमात (Rabi Sowing Increase In Wheat Sowing)

देशभरात सर्वसाधारणपणे 648.33 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड (Rabi Sowing) केली जाते. यावर्षी झालेल्या गहू पिकाच्या लागवडीत वाढ झाली असून, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये आतापर्यंत एकूण 239.79 लाख हेक्टरवर गहू पेरणी झाली आहे. या चारही राज्यांमध्ये गहू पेरणीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत एक टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी या चारही राज्यांमध्ये याच कालावधीत 237.37 हेक्टरवर गहू पेरणी झाली होती. दरम्यान, देशभरात यावर्षी 320.54 लाख हेक्टरवर गहू पेरणी झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 324.58 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. आणखी एक आठवडाभर गव्हाची पेरणी सुरु राहू शकते. त्यामुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

हरभरा लागवडीत घट

रब्बी हंगामातील कडधान्यांच्या लागवडीत यावर्षी आतापर्यंत 7 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी आतापर्यंत देशभरात 142.49 लाख हेक्टरवर कडधान्याची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 153.22 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. यामध्ये प्रामुख्याने 97.05 लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 105.8 लाख हेक्टरवर झाली होती. अर्थात यावर्षी हरभरा लागवडीत 8 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. तर यावर्षी आतापर्यंत देशात 18.68 लाख हेक्टरवर मसूर लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 18.02 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती.

दरम्यान, रब्बी हंगामातील तेलबियांची लागवड ही 104.96 लाख हेक्टरवर झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 105.15 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. धानाच्या रब्बी हंगामातील लागवडीतही यावर्षी आतापर्यंत घट नोंदवली गेली असून, यावर्षी 14.36 लाख हेक्टरवर धान लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 16.57 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. तसेच यावर्षी 47.29 लाख हेक्टरवर भरडधान्यांची लागवड झाली असून, मागील वर्षी याच कालावधीत ती 46.64 हेक्टरवर नोंदवली गेली होती.

error: Content is protected !!