Radhanagari Dam : मोठी बातमी! राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा खुले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Radhanagari Dam : मागच्या काही दिवसात राज्यात होत असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळी देखील झपाट्याने वाढली आहे. दरम्यान कोल्हापूर मध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात आज ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान राधानगरी धरणाचे तीन स्वयं चलित दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. धरणातून एकूण ५६८४ पाण्याचा विसर्ग होत आहे तर जिल्ह्यामध्ये 27 बंधारे पाने खाली असल्याची माहिती समोर आली आहे.

मागच्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी पावसामुळे बंद करण्यात आला होता. मात्र आता पर्यटकांसाठी हा धबधबा पुन्हा खुला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे त्यामुळे धबधबा पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. (Radhanagari Dam)

शेतकरी मित्रांनो सध्याची पावसाची स्थिती पाहता तुम्ही आधी हवामान अंदाज पाहून पुढील कामाचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला हवामान अंदाज पाहायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा यामध्ये तुम्ही रोजचा ताजा हवामान अंदाज पाहू शकता. त्याचबरोबर शेतमालाचे बाजारभाव, सरकारी योजनांची माहिती, पशुंची खरेदी विक्र, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यामुळे लगेचच हे अँप इंस्टाल करा.

राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी खुला (Rautwadi Falls)

दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी राधानगरी तालुक्यातील मुसळधार पावसामुळे राऊतवाडी येथील धबधब्याने देखील रौद्र रूप धारण केले होते. त्यानंतर 20 जुलैपासून हा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र गेल्यात दोन-तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने आता हा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

error: Content is protected !!