ऑनलाईन पद्धतीने मिळणार राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे; ‘असे’ करा बियाणे खरेदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | करोनाचे संकट आणि होणारी गर्दी टाळण्यासाठी राहुरी विद्यापीठाने गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कांद्याचे बियाणे ऑनलाइन पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 11 जूनपासून बियाणांची ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. नोंदणी करून पैसे भरल्यानंतर लगेच ग्राहकांना बियाणे मिळू शकणार आहेत. प्रति व्यक्ती (सात बारा) जास्तीत जास्त 4 किलो बियाणे शेतकऱ्यांना मिळेल.

राहुरी विद्यापीठाच्या कांदा बियाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. बऱ्याच वेळा या बियाणांची विक्री पोलीस सरक्षणामध्ये केली जाते. त्यामुळे यावर्षी विद्यापीठ काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून होत्या. विद्यापीठाने गेल्या वर्षीप्रमाणे चालू वर्षी ऑनलाइन पद्धतीने बियाने विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, बियाणे खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी www.phuleagromart.org या वेबसाईटवर 11 जूनपासून बियाणे संपेपर्यंत, कांदा बियाण्यांची खरेदी नोंदणी करता येणार आहे. यासाठी आधार कार्ड आणि सातबारा उतारा या दोन गोष्टी लागणार आहेत. ‘बसवंत 780’ या जातीचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रति किलो 2000 रुपये असा भाव या बियाण्यांना असणार आहे. नोंदणी केल्यानंतर लगेच डेबिट कार्ड, नेट बँकिंग द्वारे पैसे भरल्यानंतर व त्याची पावती जवळच्या संशोधन केंद्रावर दाखवल्यानंतर बियाणे मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!