धडक कारवाई ! अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभागाची धाडसत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

सहकार विभागाने आज अवैद सावकाती प्रकरणी परभणी तालुक्यात धाड टाकली. धाड पथकाने आज 8 ऑक्टोबर रोजी गैरअर्जदार श्री. गजानन (बजरंग) पिता गोपीचंद सामाले रा. टाकळी (कुं) ता.जि. परभणी यांच्या रहाते घरी अवैध सावकारी संबंधाने धाड टाकुन घराची झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे पथकास आढळुन आलेली आहेत. त्याची पुढील कार्यवाही सावकारांचे सहाय्यक निबंधक ता. परभणी कार्यालयामार्फत सुरु आहे.

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक ता.परभणी या कार्यालयास प्राप्त अवैध सावकारी तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधिक्षक जयंत मिना, विभागीय सहनिबंधक, औरंगाबाद. योगीराज सुर्वे, अनिलकुमार दाबशेडे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, परभणी मंगेश सुरवसे, यांच्या मार्गदर्शनाखाली सावकारांचे सहाय्यक निबंधक, ता. परभणी नानासाहेब कदम यांच्या आदेशान्वये ए. जी. निकम यांच्या पथकाने सदरील कारवाई केली.

याबाबत गैरअर्जदार यांना त्यांची बाजु मांडण्याची संधी देवून अवैध सावकारी सिध्द झाल्यास महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 मधील तरतुदीनुसार पुढिल कार्यवाही करण्यात येईल. या कारवाईमध्ये दोन शासकीय पंचाच्या उपस्थितीत पथक प्रमुख म्हणून श्रीमती ए.जी. निकम, सहकार अधिकारी श्रेणी- 1, पथक सदस्य म्हणुन एस.पी. बाशवेणी, सहकार अधिकारी श्रेणी-2, एस.एम.कनसटवाड, सहकार अधिकारी श्रेणी-2, ए. के.कदम, सहाय्यक सहकार अधिकारी, बी. टी. लिंगायत, सहाय्यक सहकार अधिकारी , जी. एम. कदम, कनिष्ठ लिपीक, तसेच पथकास पोलीस बंदोबस्त म्हणुन परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.डी.पोटे, म.पो.ना.श्रीमती.एस.एस.मोहोळकर व पोलीस नाईक एस.एम.मुठेकर यांनी कामगिरी पार पाडली.

“परभणी तालुक्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, विनापरवाना सावकारी करणाऱ्या व्यक्तींसोबत कोणत्याही प्रकारे आर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार करु नये. आवश्यकता भासल्यास परवानाधारक सावकाराकडुनच कर्ज घ्यावे. परभणी तालुक्यातील अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्ती विरूध्द कोणाची तक्रार असल्यास त्यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. परभणी, किसान नागरी बँकेजवळ, नवा मोंढा, या कार्यालयास संपर्क साधून पुराव्यासह तक्रार सादर करावी. अवैध सावकारी सिध्द झाल्यास रु.५०,०००/- दंड व पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षेची तरतुद आहे.” असे मत नानासाहेब कदम, सावकारांचे सहाय्यक निबंधक, परभणी यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!