Rain Forecast : यंदा समाधानकारक पाऊस; ‘नोआ’, सिध्दनाथाच्या भाकिताने शेतकऱ्यांना दिलासा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी पाऊसमान कसे (Rain Forecast) राहणार? हा सर्वच शेतकऱ्यांसाठी खूप जिव्हाळयाचा प्रश्न असतो. मात्र आता यावर्षीच्या पावसाबाबत दोन महत्वाच्या अपडेट समोर आल्या असून, सध्या पावसावर एल निनोचा सुरु असलेला प्रभाव हा येत्या दोन महिन्यात संपुष्टात येणार आहे. असे अमेरिकी हवामान संस्था ‘नोआ’ने म्हटले आहे. तर सोलापुरात सध्या सिध्दनाथाची यात्रा सुरु असून, या यात्रेत आगामी खरीप हंगामासाठीचा वर्तविला जाणार पावसाचा अंदाज हा राज्यभर प्रसिद्ध असून, यावर्षी राज्यात समाधानकारक पाऊस पडणार (Rain Forecast) असल्याचे भाकीत सिध्दनाथाच्या यात्रेत करण्यात आले आहे. या दोन्ही गोष्टी आज एकाच दिवशी समोर आल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा असणार आहे.

सरासरीहून अधिक पाऊस (Rain Forecast Relief To Farmers)

चालू वर्ष हे एल निनो आणि सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ठरले आहे. 2023 मध्ये देशात सरासरी 94 टक्के पावसाची नोंद (Rain Forecast) झाली. तर महाराष्ट्रातही सांगली, सातारा , सोलापूर, बीड, धाराशिव, हिंगोली, जालना, अकोला आणि अमरावती या नऊ जिल्ह्यांमध्ये इतर भागांच्या तुलनेत अपुरा पाऊस नोंदवला गेला आहे. काही भागात तर आतापासून पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र यावर्षीचा पावसाळा सुरु होण्याच्या आधीच एल निनोचा प्रभाव ओसरून, ला निनाची स्थिती आल्यास राज्यात यावर्षी माॅन्सून काळात सर्वसाधारण ते सरासरीहून अधिक पाऊस पडेल. असे अमेरिकी हवामान शास्त्र संस्था नोआ म्हटले आहे. आगामी माॅन्सून हंगामाच्या आधी प्रशांत महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळीवर येण्याचे संकेत असल्याचे नोआने म्हटले आहे.

समाधानकारक पाऊस, शांतता नांदणार

तर सोलापुरातील सिध्दनाथाच्या यात्रेचा काल तिसरा दिवस होता. या यात्रेत  सालाबादप्रमाणे यंदाही पावसाचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. या यात्रेमध्ये पावसाळ्याचे भाकीत सांगणाऱ्या देशमुख यांच्या वासराला दिवसभर चारा-पाणी न देता उपाशी ठेवले जाते. त्यानंतर पावसाची भाकणूक वर्तवण्याची सिद्धनाथ यात्रेची परंपरा आहे. त्यानुसार यावर्षी सिध्दनाथाच्या यात्रेत वर्तवण्यात आलेल्या भाकितानुसार, यंदा राज्यात समाधानकारक पाऊस राहणार असून, शांतता नांदणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात्रेत दिवसभर उपाशी ठेवलेल्या वासराने भाकीत वर्तवतांना मलमूत्र विसर्जन केल्याने, यंदा 2024 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार असून, वर्षभर राज्यात समाधानकारक पाऊस पडणार आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिध्दनाथाच्या यात्रेत दरवर्षी आगामी वर्षाच्या पाऊसमानाबाबत भाकीत करण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. 

error: Content is protected !!