हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्र (Rain Update) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहाही विभागांमध्ये शेतकऱ्यांना पाऊस, अतिवृष्टी यांचा अचूक अंदाज मिळावा. या उद्देशाने राज्य सरकारकडून ही पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची योजना राबवली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान (Rain Update) विधानसभेत दिली आहे.
ऐन पावसाळयात अचानक वातावरणात बदल (Rain Update) होऊन, कोणतीही पूर्वसूचना नसताना एखाद्या भागात ढगफुटी होते. ज्यामुळे शेतकऱ्यांसह गावातील शेती पिकांना धोका निर्माण होत असतो. मात्र आता राज्य सरकारकडून राज्यातील जवळपास 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्र बसविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजाराहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये ही यंत्र बसवली जाणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची पूर्वसूचना मिळण्यास मदत होणार आहे. इतकेच नाही तर पावसाचे स्वरूप लक्षात आल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची आणि पिकांची काळजी घेण्यासाठी सूचना गावातच मिळू शकणार आहे. अशी माहितीही मुंडे यांनी सभागृहाला दिली आहे.
‘ड्रोन मिशन’ राबवणार (Rain Update Accurate Rainfall Information)
याशिवाय संबंधित गावामध्ये झालेला पाऊस आणि शेतमालाचे झालेले नुकसान याबाबत सरकारलाही अचूक माहिती (Rain Update) होणार आहे. ज्यामुळे सरकारी पातळीवर योग्य निर्णय घेण्यासही मदत होणार आहे. असेही मुंडे यावेळी म्हणाले आहे. शेती क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाच्या संभाव्य वापराची माहिती घेऊन, शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी राज्यात ‘ड्रोन मिशन’ राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांचे सरकार केव्हाच गेले आहे. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या शिकवणीनुसार आणि छत्रपतींच्या शेतकरी धोरणाला अनुसरुन प्रामाणिक काम करणारे सरकार आहे. दोन्ही हातांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची नियत असलेले हे सरकार आहे. असेही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात म्हटले आहे.