सोयाबिन न विकतां अजून थोड दिवस थांबल्यास दर 8,500 रूपयाच्या पुढे जाईल – राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबिन हंगामाच्या सुरुवातीला ११ हजार रुपये क्विंटल असणारा दर केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे ४००० ते ४५०० रूपयापर्यंत खाली आला. (Raju shetti) परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या या विवंचनेची दखल घेत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. शेट्टी यांनी सोशल मिडीयावर सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांसाठी (soybean Farmers) एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

राजू शेट्टी यांची फेसबुक पोस्ट खालीलप्रमाणे आहे –

माझी कळकळीची विनंती !!

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जवळपास ११ हजार रूपये क्विंटलने बाजारात विकला जाणारा सोयाबिन ज्यावेळेस शेतकर्यांच्या शिवारातील सोयाबिन बाजारात येऊ लागला त्यावेळेस ४००० ते ४५०० रूपयापर्यंत खाली आला. आर्थिक दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी हा कोसळलेला दर पाहून पुन्हा एकदा हतबल झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ५ नोव्हेंबर पासून मराठवाडा व पश्चिम विदर्भात जनजागृती मेळाव्यासह , विविध आंदोलने , उपोषण करून सरकारच्या धोरणाविरोधात मोर्चे काढण्यात आले. सरकारचे धोरण व व्यापा-यांचे संगनमतामुळे कवडीमोल दराने विकला जाणारा सोयाबिन न विकण्याचे आवाहन या जनजागृती सभा व मोर्चामध्ये करण्यात आले. वीस दिवसातच ४ हजार रूपये क्विंटलने विकला जाणा-या सोयाबिनचा दर आज ६ हजार ५०० रूपये वर गेला व तो दिवसेंदिवस वाढू लागला आहे.

अजूनही राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकर्यांना माझी कळकळीची विनंती सोयापेंड आयात थांबविणे , जी. एस. टी रद्द करणे , निर्यात अनुदान वाढविणे यासह विविध मागण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. आपण आपला सोयाबिन न विकतां अजून थोड दिवस थांबल्यास निश्चितच हा दर ८५०० रूपयाच्या पुढे जाईल. अवघ्या वीस दिवसात क्विंटल पाठीमागे जवळपास २ ते २५०० हजार रूपये जादा दर राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकर्यांना आज मिळू लागला हे स्वाभिमानीच्या अथक प्रयत्नामुळे झालेल्या जनजागृतीचा विजय आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!