कोल्हापुरात रानमेव्यावरील प्रक्रिया उद्योग! तयार होतेय नवीन ओळख!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | उन्हाळा हा प्रत्येकाला थोडा उल्हासदायक वाटत असेल तर तो फक्त, उन्हाळ्यात मिळणाऱ्या आंबट-गोड चवीच्या फळांमुळे! नाहीतर सगळ्यांना उन्हाळा कधी संपेल आणि कधी नाही असे होते. उन्हाळा वाढू लागला की अंगाची लाही-लाही होते. अश्यावेळी आपल्याला हवा असतो तो रानमेवा! करवंदे, जांभळं, आवळा, कैरी-आंबा, फणस, ताडगोळे इ. फळे बाजारात उपलब्ध होतात. आणि आनंदाची बातमी म्हणजे, आता या रानमेव्यावर प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत.

नैसर्गिकरीत्या वाढलेल्या, आरोग्याला लाभदायक रानमेवा खाण्यासह त्यावर प्रक्रिया करणारा उद्योग स्थिरावत चालला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सह्यद्रीच्या कुशीतील अनेक तालुक्यांमध्ये असे व्यवसाय सुरू झाले आहेत. कृषी विभाग, जन भारती न्यास, आत्मा विभाग, स्वयंसिद्धा आदी शासकीय विभाग, स्वयंसेवी संघटना प्रक्रिया उद्योगासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहकार्य करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यातून काही बचत गट यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

कोल्हापुरातील शेनवडे येथे एका महिला बचत गटात 12 महिला सदस्य आहेत. त्या करवंद लोणचे, सरबत याचे उत्पादन प्रामुख्याने घेतात. करवंद गोळा करणे, प्रक्रिया करणे, विविध प्रेक्षणीय स्थळावर थेट विक्री करणे या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि आर्थिक लाभ या गोष्टी साध्य करण्याचा प्रय होत आहे. या बचत गटातून त्या महिला रोजगारनिर्मिती देखील करत आहेत. आणि आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये रानमेवा उपलब्ध करून देत आहेत.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7

Leave a Comment

error: Content is protected !!