Koyna Dam : मोठी बातमी! कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Koyna Dam : मागच्या चार-पाच दिवसापासून राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे. अनेक नदी नाल्यांना पूर आले आहे. त त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्राची पातळी देखील झपाट्याने वाढली आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याचबरोबर कोयना धरणाचा पाणीसाठा आता 50 टक्क्यांवर गेला आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी कोयना धरण हे महत्त्वाचे धरण मानले जाते.

मागील आठ दिवसात तब्बल दहा ते बारा टीएमसी पाणीसाठा वाढल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. ठीक ठिकाणी पाऊस झाला आहे त्याचबरोबर पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर वाड्यावस्त्यांवर असलेल्या नागरिकांना स्थलांतर होण्यास प्रशासनाकडून सूचना देखील देण्यात आल्या आहेत. (Koyna Dam )

गेल्या 24 तासात कोयनानगर या ठिकाणी 145 मिलिमीटर, नवजाला या ठिकाणी 189 मिलिमीटर आणि महाबळेश्वर या ठिकाणी 176 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. हे धरण पाण्याने भरल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Hello krushi ॲप बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

शेतकरी मित्रांनो आम्ही खास तुमच्यासाठी Hello Krushi हे ॲप बनविले आहे. यामध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व गोष्टींची माहिती अगदी अचूक आणि सोप्या पद्धतीने मिळेल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपलेHello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!