Rat In Farm : पिकांमध्ये उंदरांचा सुळसुळाट; ‘हा’ पक्षी करतोय शेतकऱ्यांची मदत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी असे अनेक पीक घेत असतात. ज्या पिकांमध्ये उंदरांच्या प्रकोप (Rat In Farm) झालेला आढळतो. शेतातच नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या खळ्यावर देखील उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. शेतकरी उंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पर्याय करत असतात. मात्र, हा छोटासा चतुर प्राणी नेहमीच दडून बसतो. आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. मात्र, घुबड हा एक असा पक्षी आहे. ज्याच्या केवळ असण्याने उंदीर हे शेतामध्ये (Rat In Farm) नावाला देखील मागे शिल्लक राहत नसल्याचे एका अध्ययनातून समोर आले आहे.

भारतात दोन मुख्य प्रजाती (Rat In Farm Owl Helps Farmers)

घुबड या पक्षाच्या माध्यमातून उंदरांचा प्रकोप कमी करता येतो. याबाबत अलीकडेच एक अध्ययन करण्यात आले असून, त्यात बऱ्याच देशांमध्ये उंदरांमुळे पिकांचे नुकसान (Rat In Farm) कमी करण्यासाठी घुबड या पक्षाची संख्या वाढवण्यास शेतकरी भर देत आहे. जगभरात घुबडाच्या एकूण 200 प्रजाती असून, यातील भारतात मुआ आणि घुग्घू या दोन प्रजाती सर्वाधिक पाहायला मिळतात. मुआ ही प्रजाती पाण्याच्या आसपासच्या ठिकाणी नदीला किंवा धरणाच्या बाजूला आढळते. तर घुग्घू ही जात मुख्यतः झाडांवर रहिवास करते. 1972 च्या भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या माध्यमातून घुबड या पक्षाला संरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या पक्षांच्या वाढीला गेल्या काही दिवसांमध्ये चालना मिळाली आहे.

‘पीक संरक्षक पक्षी’ म्हणून ओळख

अलीकडे समोर आलेल्या अहवालानुसार, मलेशिया या देशासह अनेक देशांमध्ये शेतकरी घुबड पाळत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना उंदरांच्या प्रकरोपासून पूर्णतः मुक्तता मिळाली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव देखील कमी दिसून आला आहे. ज्यामुळे मलेशियामध्ये घुबड पक्षांना आपल्या शेतांच्या बाजूला झाडांवर रहिवासासाठी अनुकूल वातावरण तयार करत त्यांचे पालन करत आहे. इतकेच नाही मलेशियामध्ये घुबडया पक्षाची ‘पीक संरक्षक पक्षी’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

घुबड पक्षाचे वैशिष्ट्ये?

घुबड हा पक्षी माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेपेक्षा 10 पट कमी तीव्रतेचा आवाज ऐकू शकतो. ज्यामुळे तो उंदरांची शिकार पाहताक्षणी करतो. तसेच एक घुबड पक्षी वर्षाला जवळपास एका हजाराहून अधिक उंदीर खाण्याची क्षमता ठेवतो. याशिवाय दिवसाच्या तुलनेत घुबड पक्षाला रात्री स्पष्ट दिसते. ज्यामुळे रात्रीच्या त्यांना उंदरांची शिकार करणे सोईस्कर पडते. इतकेच नाही घुबड हे पिकांवरील किडी देखील खातात. ज्यामुळे त्यांना सफाई कामगार या नावाने देखील ओळखले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या या पक्षाला शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या बाजूला झाडांवर अधिवास निर्माण करून, पिकांचे संरक्षण करण्यास मदत होते.

error: Content is protected !!