Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद पेटण्याची शक्यता? रविकांत तुपकर यांना 15 ऑगस्टची डेडलाईन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ravikant Tupkar : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रमाणे आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील फुटते की काय असा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याकडून नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ देखील उडाली आहे.

पुण्यामध्ये काल बैठक

याच पार्श्वभूमीवर काल पुण्यामध्ये पक्षाच्या शिस्त पालन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र रविकांत तुपकर हे या बैठकीला गैरहजर राहिले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रविकांत तुपकर यांच्या गैरहजर राहण्याने अनेक चर्चा सुरू असून अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. त्याचबरोबर रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ सोडणार असल्याच्या देखील चर्चांना उधाण आले आहे.

रविकांत तुपकर यांना 15 ऑगस्टची डेडलाईन

रविकांत तुपकर हे बैठकीला हजर नसल्यामुळे त्यांना समितीकडून आपली भूमिका मांडण्यासाठी 15 ऑगस्ट ची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होणार की नाही हे स्पष्ट होईल. रम्यान, काल झालेल्या बैठकीमध्ये राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांनी केलेल्या आरोपाबाबत मोठा खुलासा केला आहे.

याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, मागच्या काही दिवसापासून रविकांत तुपकर नाराजी व्यक्त करत आहेत मात्र स्वाभिमानी एक संघ राहण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. स्वाभिमानी एक कुटुंबासारखा राज्यामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे फक्त गैरसमजातून तुपकर यांच्याकडून आरोप केले जात आहेत. असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!