हॅलो कृषी ऑनलाईन: यूएस मध्ये साखरेची आयात टेरिफ रेट कोटा (TRQs) द्वारे नियंत्रित केली जाते, ज्यामुळे साखरेची (Raw Sugar Export From India) ठराविक मात्रा कमी दरामध्ये देशात येऊ शकते. भारत सरकारने बुधवारी टेरिफ रेट कोटा (TRQ) योजनेअंतर्गत 8,606 टन कच्च्या उसाच्या साखरेची अमेरिकेला निर्यात करण्याची अधिसूचना दिली (Raw Sugar Export From India).
1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत टेरिफ रेट कोटा योजनेंतर्गत यूएसला निर्यात केल्या जाणार्या 8,606 दशलक्ष टन कच्च्या साखरेचे प्रमाण अधिसूचित केले गेले आहे,” असे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
साखरेचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक आणि सर्वात मोठा ग्राहक असलेल्या भारताकडे यूएससोबत साखर निर्यातीसाठी (Raw Sugar Export From India) प्राधान्य कोटा व्यवस्था आहे.
हा कोटा अपेडा (APEDA) द्वारे ऑपरेट केला जाईल असे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने अधिसूचनेत म्हटले आहे.
यूएसला कच्च्या उसाच्या साखरेची निर्यात (Raw Sugar Export From India) आर्थिक वर्ष 2024 साठी वाटप करण्यात आली आहे. अधिसूचनेत सांगितल्याप्रमाणे “मूळ प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास, यूएसएला साखरेच्या प्राधान्य निर्यातीसाठी, परकीय व्यापाराचे अतिरिक्त महासंचालक, मुंबई यांनी एपीईडीएच्या शिफारशीनुसार पात्र आणि प्रमाणाबाबत जारी केले जाईल. इतर प्रमाणपत्राची आवश्यकता, विशेषतः यूएसएला साखर निर्यात (Raw Sugar Export From India) करण्यासाठी विहित केल्याप्रमाणे पाळल्या जातील,” असे अधिसूचनेत म्हटले आहे.
टॅरिफ रेट कोटा ही एक यंत्रणा आहे जी विशिष्ट उत्पादनांची निश्चित प्रमाणात आयात करण्यास परवानगी देते. टॅरिफ कोटा उत्पादनांच्या विस्तृत श्रेणींसाठी वापरला जात असला तरी बहुतेक कृषी क्षेत्रातील उत्पादनांचा यात समावेश होतो. तृणधान्ये, मांस, फळे आणि भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ सर्वात सामान्य आहेत आणि बहुतेक उत्पादक देशांमध्ये साखर देखील संरक्षित आहे.
यूएस मध्ये साखरेची आयात TRQs द्वारे नियंत्रित केली जाते, जे कमी दरात साखरेची विशिष्ट प्रमाणात देशात प्रवेश करण्यास परवानगी देतात. कच्च्या उसाची साखर, रिफाईन्ड साखर, साखर सिरप, विशेष साखर आणि साखरयुक्त उत्पादनांच्या आयातीवर TRQ लागू होतात.
सरकारने साखरेच्या निर्यातीवर (Raw Sugar Export From India) (कच्ची साखर, पांढरी साखर, शुद्ध साखर आणि सेंद्रिय साखर) निर्बंध 31 ऑक्टोबर 2023 नंतर वाढवले आहेत .