कच्ची साखर निर्यात यंदा फायदेशीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दर चांगला मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने यंदा कच्च्या साखरेच्या निर्यातीची संधी भारताला उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर तुटवडा भासला याची शक्यता असल्याने कच्च्या साखरेला चांगला दर मिळू शकतो. पुरेशा प्रमाणात साखर निर्यात झाल्यास देशातील स्थानिक साखर विक्रीवरील दबाव कमी होणार आहे. कारखान्याची हंगामात ऐनवेळी पळापळ होऊ नये यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ नदी हंगाम सुरू होण्यापूर्वी कच्ची साखर निर्यात करार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून देशांना साखर निर्यात समाधानकारक कामगिरी केली आहे अनुदान मिळणार असल्याने अनेक साखर कारखाने निर्यातीला प्राधान्य दिले त्यामुळे 55 लाखाहून अधिक टन साखर निर्यात झाली. चांगला दर मिळाल्याने कारखान्याने निर्यातीला प्राधान्य दिलं गेल्या वर्षी निर्यात अनुदान योजना उशिरा म्हणजे डिसेंबरमध्ये जाहीर झाल्याने कारखान्यांना साखर निर्यातीसाठी धावाधाव करावी लागेल. यंदाही धावाधाव टाळण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाला कारखान्यांना एक पत्र लिहून कारखान्यांनी कच्ची साखर तयार करण्याला प्राधान्य द्यावं व त्याचे करार करून ती जास्तीत जास्त निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे.

पक्या साखरेच्या तुलनेत कच्ची साखर जास्त वेळ साठा करून ठेवता येत नाही. आपण जितकी कच्ची साखर तयार करणार आहोत तितक्या साखरेचे करार आतापासून बाहेरच्या देशात अशी करावे जशी साखर तयार होईल तशी ती साखर पाठवल्यास बाजारात असणाऱ्या चांगल्या दराचा फायदा साखर कारखान्यांना होऊ शकतो असं साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!