Record Arrival of Turmeric: हिंगोली बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक; मोजमाप करण्यासाठी लागेल 4 दिवसांचा कालावधी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हिंगोली येथील बाजार समितीच्या हळद मार्केट (Record Arrival of Turmeric) यार्डात यंदाच्या वर्षातील विक्रमी आवक 15 एप्रिल रोजी झाली. तब्बल 20 हजार क्विंटल हळद विक्रीसाठी (Turmeric Selling) आली असून, मार्केट यार्ड (Market Yard) आवारासह बाहेरील रस्त्यावर वाहनांची एक ते दीड कि.मी.पर्यंत रांग लागली. या सर्व हळदीचे मोजमाप करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, क्विंटलमागे भावात जवळपास पाचशे रूपयांची घसरण झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

मराठवाड्यासह विदर्भात (Turmeric Buying & Selling) प्रसिद्ध असलेल्या येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात विक्रमी आवक (Record Arrival of Turmeric) होऊ लागली आहे. 15 एप्रिल रोजी भावात क्विंटलमागे जवळपास पाचशे रुपयांची घसरण झाली तरी सध्या मिळणारा भाव (Turmeric Rate) समाधानकारक आहे. त्यामुळे हळद तयार होताच शेतकरी मार्केट यार्डात विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे आवक वाढत (Record Arrival of Turmeric) आहे.

14 एप्रिल रोजी मार्केट यार्ड रविवारच्या नियमित सुटीमुळे बंद होते. परंतु, सोमवारी खरेदी-विक्री होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी रविवारीच हळद (Turmeric) घेऊन मार्केट यार्ड जवळ केले.

त्यामुळे रात्री 8 वाजेपर्यंत मार्केट यार्डात वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. परिणामी, नंतर आलेल्या वाहनांना मार्केट यार्डाबाहेरील रेल्वे स्टेशन रोडवर वाहने उभी करावी लागली. सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जुने पोलीस अधीक्षक कार्यालय, जुन्या शासकिय रुग्णालयापर्यंत वाहनांची रांग लागली होती.

दररोज 5000 क्विंटलचा काटा (Record Arrival of Turmeric)

मार्केट यार्डातील मनुष्यबळानुसार दररोज पाच हजार क्विंटलचा काटा होऊ शकतो. शेतकर्‍यांच्या हळदीचे लवकर मोजमाप व्हावे यासाठी बाजार समितीचा प्रयत्न असतो, परंतु, विक्रमी आवक होत असल्यामुळे उशीर लागत असल्याचे चित्र आहे. सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जवळपास 20 हजार क्विंटलची आवक झाल्याने मोजमापासाठी चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

13,000 ते 16,000 हजाराचा मिळाला भाव (Turmeric Rate)

गत आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे पाचशे ते सातशे रूपयांनी भाव घसरले आहेत. सोमवारी 13 हजार ते 16 हजार रुपया दरम्यान हळदीला भाव मिळाला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हळदीत ओलसरपणा आल्यामुळे भाव किंचित घसरल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे, परंतु, येणार्‍या दिवसात भाव वधारण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

प्रत्येक वाहनाची नोंद आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग

हळदीची विक्रमी आवक (Record Arrival of Turmeric) होत असल्याने बाजार समितीच्या (Bajar Samiti) वतीने येणार्‍या प्रत्येक वाहनाची नोंद करण्यात येत आहे. दाखल होणारी वाहने नंबरनुसार रांगेत उभी करण्यात येत असून, त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले जात आहे. त्यामुळे मार्केट यार्ड आवारात आणि मोजमापासाठी नंबरनुसार वाहने सोडणे सोयीचे होत आहे. यामुळे शेतकर्‍यांतूनही समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!