Red Chilli Variety : लाल मिरचीचे तीन नवीन वाण विकसित; रोगांना नाही पडत बळी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात लाल मिरचीचे (Red Chilli Variety) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नंदुरबार जिल्हा आणि संभाजीनगरचा सिल्लोड परिसर लाल मिरचीच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. अशातच आता लाल मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बंगळुरू येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने (आयआयएचआर) हायब्रीड लाल मिरचीचे तीन नवीन वाण विकसित केले आहे. मिरचीचे हे तीनही वाण रोगांना बळी पडत नसल्याचे संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे आता लाल मिरची (Red Chilli Variety) उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

‘ही’ आहेत तीन वाणांची नावे (Red Chilli Variety Developed)

भारतीय फळबाग संशोधन संस्थेने (आयआयएचआर) विकसित केलेल्या तीन लाल मिरचीच्या वाणांना (Red Chilli Variety) ‘अर्का निहिरा’, ‘अर्का धृति’ आणि ‘अर्का गगन’ अशी नावे देण्यात आली आहे. साधारणपणे लाल मिरचीचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना पांढरी माशी, मावा, तुडतुडे, मर रोग यांच्या प्रादुर्भावामुळे मोठा आर्थिक फटका बसतो. मात्र आता फळबाग संशोधन संस्थेने विकसित केलेल्या या तीनही नवीन प्रजाती या रोगांना बळी पडत नसल्याचे संस्थेच्या भाजीपाला विभागाच्या प्रमुख संशोधक माधवी रेड्डी के. यांनी म्हटले आहे. लवकरच हे तिन्ही वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. संस्थेने 11 लाल मिरचीच्या प्रजाती विकसित केलेल्या आहेत. मात्र, नव्याने विकसित तीनही प्रजाती शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मर रोगामुळे वार्षिक मोठे नुकसान

मिरचीचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना मुळापासून ते पानापर्यंत रोगांचा सामना करावा लागतो. यामध्ये पीआरआर हा रोग (मर रोग) लाल मिरचीला मातीमध्ये असणाऱ्या विनाशकारी कवकांमुळे होतो. अतिपाऊस झाल्यास लाल मिरचीची मुळे सडून हा रोग शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकांना घेऊन बसतो. मर रोग हा लाल मिरचीवरील सर्वात घातक रोग मानला जातो. या एका रोगामुळे जागतिक पातळीवर लाल मिरचीच्या उत्पादनाला वार्षिक जवळपास 100 दशलक्ष डॉलर इतका मोठा फटका बसतो. त्यामुळे आता तीनही प्रजाती या रोगाला बळी पडत नसल्याने, देशातील लाल मिरचीच्या पिकासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे भारतीय फळबाग संशोधन संस्थेने (आयआयएचआर) म्हटले आहे.

error: Content is protected !!