हॅलो कृषी ऑनलाईन : नंदुरबार जिल्हाची लाल मिरचीच्या (Red Chillies) उत्पादनासाठी देशात विशेष ओळख आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातील लाल मिरचीची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असून, या ठिकाणी सध्या दररोज जवळपास 3 ते 4 हजार क्विंटल मिरचीची (Red Chillies) आवक होत आहे. आवक असूनही दर कायम असल्याचे चित्र बाजार समितीत दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्ह्याप्रमाणे शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातूनही बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र जवळपास 25 ते 26 व्यापारी माल खरेदी करण्यासाठी उपलब्ध असल्याने आवक वाढूनही बाजार समितीत मिरचीचे (Red Chillies) दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीला तीन ते साडे सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे ओल्या लाल मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावर्षी विक्रमी उलाढाल (Red Chillies Market Nandurbar)
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी 90 हजार क्विंटल मिरची खरेदी केली असून अजून हंगाम पाच महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे यावर्षी नंदुरबार बाजार समितीत लाल मिरची खरेदी-विक्रीचा विक्रमी व्यापार होण्याची शक्यता आहे. असे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी म्हटले आहे. दरम्यान लाल मिरचीच्या दरात यावर्षी दुपटीने वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत लाल मिरचीला 2500 रुपयांपर्यंत दर मिळत होता.
प्रक्रिया उद्योग उभारण्याची मागणी
आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यानंतर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील मिरचीचा बाजार हा देशातील सर्वात मोठा सर्वात मोठा दुसरा बाजार मानला जातो. नंदुरबार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन होते. त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारकडून मिरची प्रक्रिया उद्योग उभारण्यात यावा. तसेच मिरची संशोधन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी आता शेतकरी व व्यापारी वर्गाकडून केली जात आहे. ज्यामुळे याचा शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा शकतो. याशिवाय सरकारकडून मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चित धोरण तयार करण्यात यावे, अशी मागणीही विक्रीस आलेले शेतकरी करत आहेत.