Republic Day : महाराष्ट्रातील 10 शेतकरी ‘प्रमुख अतिथी’; प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीहून निमंत्रण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) (26 जानेवारी) हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असतो. मात्र आता राज्यातील शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी असून, याच प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्ली येथील कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील 10 शेतकऱ्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन संचाची प्रभावी उभारणी करत प्रगती साधल्याने, राज्यातील या 10 शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे शेतकरी राज्याचे नेतृत्व करत 26 जानेवारी रोजी विशेष पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

सध्या सरकारी पातळीवर प्रजासत्ताक दिनाची (Republic Day) जोरदार तयारी सुरु आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार असल्याने सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारकडून पाण्याच्या बचतीसह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ‘प्रतिथेंब, ‘अधिक पीक’ ही योजना राबवली जात आहे. याच योजनेच्या माध्यमातून राज्यातील दहा शेतकऱ्यांनी प्रगतीची वाटचाल सोपी केलेली आहे. केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सूक्ष्म जलसिंचनासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या मिळालेल्या अनुदानच्या माध्यमातून प्रगती साधलेल्या राज्यातील 10 शेतकऱ्यांची विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली आहे.

ही आहेत 10 शेतकऱ्यांची नावे (Republic Day 10 Farmers ‘Chief Guest’)

  • अमोल भास्करराव पुंडकर (ता. शेगाव, जि. बुलडाणा)
  • दिलीप काळे (मोहाडी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा)
  • चंद्रकांत सोळुंके (चिमनापूर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर)
  • काकासाहेब चाथे (चाथा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर)
  • बापूराव श्रावण बडगुजर (पाचोरा, जि. जळगाव)
  • अमोल गणेश पाटील (केऱ्हाळे, ता. रावेर, जि. जळगाव),
  • अशोक जाधव (काथापूर, ता. आंबेगाव, जि. पुणे)
  • दीपक गुरगुडे (बाभूळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे)
  • बापू गजेंद्र नहाने (देवधानोरा, ता. कळंब, जि. धाराशिव)
  • श्रीकांत गोविंदराव भिसे (एकुरका, ता. कळंब, जि. धाराशिव)

विशेष म्हणजे राज्यातील या सर्व 10 शेतकऱ्यांचा 24 ते 26 जानेवारी असा तीन दिवसांचा दिल्ली दौरा असणार आहे. केंद्र सरकारकडून निमंत्रित करण्यात आल्याने हे सर्व शेतकरी सपत्नीक प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. या सर्व शेतकऱ्यांचा प्रवास भत्ता, प्रतिदिन रहिवास खर्च हा सरकारडून दिला जाणार असून, या शेतकऱ्यांना कार्यक्रमासाठी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे लागणार आहे.

error: Content is protected !!