Rice Cultivation : खरीप हंगामात भात लागवडीत 4.3 टक्के वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rice Cultivation : ओडिशा, आंध्र प्रदेश, आसाम आणि कर्नाटकमधील पेरण्या कमी झाल्यामुळे धान लागवडीखालील क्षेत्र कमी झाले होते. पण आता पेरण्यांनी वेग घेतला आहे. चालू खरीप हंगामात, देशभरात आतापर्यंत धानाच्या पेरणीखालील क्षेत्र ४.३३ टक्क्यांनी वाढून ३६०. ७९ लाख हेक्टरवर पोहोचल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

खरीप हंगामात देशातील सुमारे ८० टक्के भाताचे पीक घेतले जाते. सत्र साधारणपणे जून ते सप्टेंबर असते. गेल्या वर्षात खरिपाच्या याच कालावधीत ३४५ लाख हेक्टर क्षेत्रात खरीपाचे मुख्य पीक असलेल्या भात लागवड कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार चालू खरीप हंगामाच्या १८ ऑगस्टपर्यंतच्या ओडिशात २४.८० लाख हेक्टरमध्ये भाताची पेरणी झाली होती. गेल्या वर्षातल्या याच कालावधीच्या तुलनेत त्यामध्ये ०.४३ लाख हेक्टरने घट झाली आहे.

आसाममध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत ०.६१ लाख हेक्टरने कमी म्हणजे १६.६१ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. आंध्र प्रदेशात १८ ऑगस्टपर्यंत ८.२९ लाख हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १.५३ लाख हेक्टरने कमी आहे. चालू खरीप हंगामात तेलबियांची पेरणीही १८५.९१ लाख हेक्टरवर झाली आहे. आधीच्या वर्षात १८९. ०८ लाख हेक्टरमध्ये लागवड झाली होती. देशभरात भरड तृणधान्याखालील क्षेत्र १७३.६० लाख हेक्टरवरून १७६.३९ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे.

नगदी पिकांमध्ये उस लागवडीखालील क्षेत्रफळामध्ये किरकोळ वाढ झाली असून, ती गेल्या वर्षातल्या ५५.३२ लाख हेक्टरवरून ५५.३२ लाख हेक्टर झाली आहे. कापसाचे क्षेत्र १२१.८६ लाख हेक्टर इतके कमी झाले आहे. गतवर्षी याच वेळी १२४.२१ लाख हेक्टर होते. मात्र, कडधान्य पेरण्या मागे पडत आहेत. त्याचे क्षेत्र ११४.९२ लाख हेक्टर आहे, जे एक वर्षापूर्वी ११.५९ लाख हेक्टर कमी आहे

error: Content is protected !!