Rice Export : टांझानियाला 30,000 टन गैर-बासमती तांदूळ निर्यात होणार; केंद्राची मंजुरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून 20 जुलै 2023 रोजी देशामधून गैर-बासमती तांदूळ निर्यात (Rice Export) करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असतानाच आता अफ्रिकी देशांसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून आज (ता.2) टांझानिया, जिबूती आणि गिनी बिसाऊ या तीन आफ्रिकी देशांना एकूण 30,000 टन गैर-बासमती तांदूळ निर्यात (Rice Export) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाकडून आज याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

मैत्रीपूर्ण संबंधांमुळे निर्यातीत सूट (Rice Export From India)

केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारात तांदळाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मागील वर्षीच्या जुलै महिन्यात गैर-बासमती तांदूळ निर्यातीवर (Rice Export) बंदी घातली आहे. मात्र, भारताचे नेपाळ, भूतान, बांग्लादेश आणि आफ्रिकी देश यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहे. तर शेजारील असलेले हे देश भाजीपाल्यासह अनेक गोष्टींबाबत भारतावर अवलंबून आहेत. त्यामुळे देशात काही घटकांवर निर्यात बंदी असताना देखील विशेष अधिकारातून या देशांना मदत केली जाते. त्यानुसार आता या तीन देशांना भारतीय राष्ट्रीय सहकारी निर्यात संघाकडून हा एकूण 30,000 टन तांदूळ निर्यात केला जाणार आहे.

निर्बंध असूनही सर्वाधिक निर्यात

केंद्र सरकार आपले घनिष्ट संबंध असलेल्या देशांना विशेष शिफारस करून ही निर्यात करत आहे. यामध्ये प्रामुख्याने नेपाळ, फिलिपिन्स, मलेशिया, भूतान, मॉरीशस, सिंगापुर, संयुक्त अरब अमीरातीसह अनेक आशियायी देश आणि अफ्रीकी देशांना भारताने आतापर्यंत गैर-बासमती तांदळाची निर्यात केलेली आहे. दरम्यान, भारताने तांदूळ निर्यातीत यावर्षी मोठी झेप घेतली असून, मागील दशकामध्ये पाचव्या स्थानी असलेला भारत सध्या प्रथम स्थानी आहे. यावर्षी 2023-24 या आर्थिक वर्षात निर्यात निर्बंध असताना देखील देशातून सर्वाधिक तांदूळ निर्यात करण्यात आली आहे. दरम्यान, यावर्षी देशातून एकूण 23 दशलक्ष टन तांदूळ निर्यात झाल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होते.

error: Content is protected !!