Rice Export : पाच देशांना गहू, तांदूळ निर्यात करण्यास सरकारची मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने (Rice Export) पाच देशांना 9 लाख टन ब्रोकन राईस (तुकडे झालेला तांदूळ) आणि भूतान या देशाला 34 हजार टन गहू आणि गहूजन्य उत्पादनांची निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. या तांदूळ (Rice Export) आणि गव्हाची निर्यात ही राष्ट्रीय सहकारी निर्यात लि. (एनसीईएल) या सरकारी एजन्सीच्या माध्यमातून केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचानलयाकडून (डीजीएफटी) याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

विदेश व्यापार महासंचानलयाच्या (डीजीएफटी) परिपत्रकात म्हटले आहे की, 20 जून 2023 आणि 28 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेस (Rice Export) सरकारकडून रद्द करण्यात आले होते. मात्र आता सरकारकडून यावेळी 8 लाख 98 हजार 804 टन तुटलेला तांदूळ निर्यात करण्यात परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख टन तांदूळ हा सेनेगल या आफ्रिकी देशाला पुढील सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने निर्यात केला जाणार आहे. याशिवाय इंडोनेशिया या देशाला 2 लाख टन, माली या देशाला एक लाख टन तांदूळ निर्यात केला जाणार आहे. आफ्रिकी देश असलेल्या गाम्बिया या देशाला 50 हजार टन तांदूळ पुढील सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने पाठवला जाणार आहे. असेही डीजीएफटीने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.

भूतानला गहू निर्यात (Rice Export From India)

याव्यतिरिक्त भूतान या देशाला 48 हजार 804 टन तांदूळ निर्यात केला जाणार आहे. अशा एकूण 8 लाख 98 हजार 804 टन तांदळाच्या (तुकडे झालेला तांदूळ) निर्यातीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याव्यतिरिक्त भूतान या देशाला 14 हजार 184 टन गहू, 5 हजार 326 टन गहू पीठ, 15 हजार 226 टन मैदा आणि रवा निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. असेही डीजीएफटीने म्हटले आहे.

सरकारी पातळीवरील निर्णय

दरम्यान, पांढरा तांदूळ, तुटलेला तांदूळ आणि गहू-गहूजन्य पदार्थांच्या निर्यातीवर सरकारकडून पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मात्र, हा निर्यात निर्णय सरकारी पातळीवरील असल्याचे डीजीएफटीने म्हटले आहे. त्यामुळे निर्यात बंदीच्या काळातही सरकारकडून यापूर्वी जवळपास 12 देशांना 10 लाख टन तांदूळ निर्यात करण्यात आला आहे. असेही डीजीएफटीने म्हटले आहे.

error: Content is protected !!