Rice Export : भारताने करून दाखवलं; बनलाय सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताने तांदूळ निर्यातीत (Rice Export) मोठी झेप घेतली असून, मागील दशकामध्ये पाचव्या स्थानी असलेला भारत सध्या प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. यावर्षी 2023-24 या आर्थिक वर्षात देशात निर्यात निर्बंध असताना देखील देशातून 23 दशलक्ष टन इतकी सर्वाधिक तांदूळ निर्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या पाच देशांमधील उर्वरित चार देशांना मिळून भारताइतकी तांदूळ निर्यात करता आलेली नाही. एकट्या भारताने उर्वरित चार देशांपेक्षा अधिक तांदूळ निर्यात केली असून, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार (Rice Export) देश ठरला आहे.

निर्यात निर्बंध असूनही… (Rice Export From India)

भारताने यावर्षी केलेली तांदूळ निर्यात (Rice Export) ही एकूण जागतिक तांदूळ निर्यातीपैकी 40.8 टक्के इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे जगातील मोठ्या लोकसंख्येच्या ताटात भारतीय तांदूळ जातो. अनेक देशांमधील जनता ही भारतीय तांदळावर अवलंबून असते. जुलै 2023 पासून देशातील नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीवतर बंदी घालण्यात आली आहे. मात्र निर्यातबंदी केलेली असताना देखील देशाने तांदूळ निर्यातीत आघाडी घेतली आहे. वर्ष 2010-11 या आर्थिक वर्षात भारताची तांदूळ ही फक्त 2.8 दशलक्ष टन होती. तर याउलट शेजारील देश असलेल्या पाकिस्तानातून त्यावेळी 3.4 मिलियन टन तांदूळ निर्यात होत होती. तर थायलंड हा देश 10.6 दशलक्ष टनांसह प्रथम स्थानी होता. व्हिएतनाम हा देश 7 दशलक्ष टन तांदूळ निर्यात करत होता. त्यामुळे आता जवळपास 13 वर्षांच्या कालावधीनंतर भारताने तांदूळ निर्यात करण्यात प्रथम स्थानी झेप घेतली आहे.

यावर्षीचे 5 प्रमुख तांदूळ निर्यातदार देश

  • प्रथम क्रमांक – भारत 23 दशलक्ष टन
  • दुसरा क्रमांक – थायलंड 7.5 दशलक्ष टन
  • तिसरा क्रमांक – व्हिएतनाम 7.5 दशलक्ष टन
  • चौथा क्रमांक – पाकिस्तान 4.5 दशलक्ष टन
  • पाचवा क्रमांक – अमेरिका 2.5 दशलक्ष टन
error: Content is protected !!