Rice Export : देशातून विक्रमी बासमती तांदूळ निर्यात; मिळाले 48000 कोटींचे परकीय चलन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अन्नधान्याच्या बाबतीत भारत आघाडीवर असून, गव्हासह तांदळाचे (Rice Export) देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तसेच देशातून धान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात देखील केली जाते. यंदा देशातून बासमती तांदळाची आजवरची विक्रमी निर्यात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ४८ हजार कोटी रुपये मूल्याच्या ५० लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मागील दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत बासमती तांदळाच्या निर्यातीत ११.५ टक्क्यांनी वाढ होऊन ४४ हजार कोटी रुपये मूल्याच्या ४९ लाख टन तांदळाची निर्यात (Rice Export) झाली होती. अर्थात यंदा केवळ वजनाच्या बाबतच नाही, तर मूल्याच्या बाबतही विक्रमी निर्यात ठरली आहे.

सौदी अरेबिया सर्वात मोठा आयातदार (Rice Export From India)

सौदी अरेबिया हा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश ठरला आहे. सौदी अरेबियात भारताने यावर्षी 10.98 लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ विकून 10391 कोटी रुपये कमावले आहेत. या देशात मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 2023 ते मार्च 2024 पर्यंत, भारताने जगातील 100 हून अधिक देशांमध्ये 52,42,511 मेट्रिक टन बासमती तांदूळ निर्यात केला आहे. वर्षभरात निर्यातीतून भारताने 48389.2 कोटी रुपये कमावले आहेत. पाकिस्तानच्या अडथळ्यानंतरही मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात केली जात आहे.

किती दराने झाली निर्यात

निर्यातीसाठी बासमतीचे दर प्रतिटन आठ ते १२ हजार रुपयांपर्यंत (Rice Export) राहिले. भारतातून निर्यात होणाऱ्या बासमती तांदळामध्ये पारंपरिक बासमती, ११२१ बासमती, १५०९ बासमती, १४०१ बासमती, पूसा बासमती या वाणांचा समावेश असतो. देशात प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर या राज्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या बासमती तांदळाचे उत्पादन होते. गंगा नदीच्या खोऱ्यात पाणी आणि जमिनीच्या गुणधर्मामुळे दर्जेदार बासमती तांदळाचे उत्पादन होते.

निर्यातीसाठी पोषक वातावरण

देशातून बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे जगभरात बिगरबासमती तांदूळ खाणाऱ्यांनी बासमती तांदळाला प्राधान्य दिले जात आहे. पाकिस्तानमधून बासमती तांदळाची निर्यात होते, पण राजकीय अस्थिरता, निवडणुकांमुळे पाकिस्तानमधून होणारी निर्यात घटली आहे. परिणामी भारतीय बासमती तांदळाची निर्यात वाढली आहे. मागील वर्षात बासमतीचे चांगले उत्पादन झाले होते. वर्षभर दर स्थिर होते. एकूण परिस्थिती पाहता बासमती तांदळाच्या निर्यातीला पोषक वातावरण होते.

error: Content is protected !!