Rice Millers Association: राईस मिलर्स संघटनेने केली धान्य भरडाई बंद; 24 लाख क्विंटल धान्य खराब होण्याची शक्यता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: गोंदिया राईस मिलर्स संघटनेने (Rice Millers Association) त्यांच्या विविध मागण्यांसाठी धान्य भरडाई बंद केली असून यामुळे 24 लाख क्विंटल धान्य (Grains) खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे (Rice Millers Association) .

महाराष्ट्रातील ‘धान्याचे कोठार’ (Granary Of Maharashtra) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया (Gondia) जिल्ह्यात सध्या वेगळीच परिस्थिती आहे. राईस मिलर्स संघटनेच्या या बंदीमुळे धान्य खराब होण्याची शक्यता आहे, कारण गेल्या सहा महिन्यांपासून खरेदी केलेले हे धान्य आता उघड्यावर आणि गोदामात पडून आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे (District Marketing Federation) धान्य साठवण्याची जागा नसल्याने नवीन धान्य खरेदी करण्यास अडचण निर्माण होत आहे.

2023-24 मध्ये, 1 लाख 25 हजार 129 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली त्यातील 80 हजार 806 शेतकर्‍यांनी 24 लाख 77 हजार 996 क्विंटल धान्य विकले होते. यासाठी 540 कोटी 94 लाख 53 हजार 76 रुपये शेतकर्‍यांना दिले गेले आहेत.

राईस मिलर्सच्या मागण्या (Rice Millers Association)

150 रुपये प्रति क्विंटल भरडाई दर, हमाली दर आणि वाहतूक दरात वाढ यासह इतर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत धान्य भरडाई बंद ठेवण्याचा निर्णय राईस मिलर्स संघटनेने घेतला आहे.

पणन विभागाचे काय म्हणणे?

2 मे 2024 पर्यंत 33 राईस मिलर्सनी (Rice Millers Association) भरडाई सुरू न केल्याने त्यांना काळ्या यादीत टाकून करार रद्द करण्याचे आणि EMD जप्त करण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. परंतु राईस मिलर्स मागे हटण्यास तयार नाहीत.

या समस्येवर तोडगा काय निघेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. शेतकर्‍यांच्या धान्याचे काय होईल याची चिंता वाढत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या समस्येचा राजकीय वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

error: Content is protected !!