Rice Production : जागतिक तांदूळ उत्पादन 52.10 कोटी टन होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय अन्नधान्य परिषदेने (आयजीसी) 2023-24 या वर्षात जागतिक तांदूळ उत्पादन (Rice Production) 52.10 कोटी टन इतके विक्रमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जे मागील वर्षी 2022-23 याच कालावधीत (Rice Production) नोंदवल्या गेलेल्या 51.50 कोटी टनांपेक्षा 60 लाख टनांनी अधिक असणार आहे. 2021-22 मध्ये जागतिक तांदूळ उत्पादन 51.50 कोटी टन नोंदवले गेले होते. तर 2020-21 मध्ये 51 कोटी टन इतके तांदूळ उत्पादन नोंदवले गेले होते.

आंतरराष्ट्रीय अन्नधान्य परिषदेच्या अहवालानुसार, 2023-24 या वर्षात तांदळाचा जागतिक बाजार हा केवळ 5 कोटी टनांवर मर्यादित राहिला आहे. जो मागील वर्षी 2022-23 मध्ये 5.20 कोटी टन इतका नोंदवला गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या आयात-निर्यातीमध्ये कमतरता येण्यामागे सर्वात मोठे कारण हे भारत सरकारकडून तांदूळ निर्यातीवर घातलेली बंदी हे सांगितले जात आहे. भारत सरकारकडून अलीकडेच तांदूळ निर्यात मूल्यात काहीशी घट करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे फारशी निर्यात होऊ शकली नाही. 2021-22 मध्ये तांदळाचा जागतिक बाजार 5.60 कोटी टनांवर पोहचला होता. तर 2020-21 मध्ये तो 5.10 कोटी टन इतका नोंदवला गेला होता.

यावर्षी ‘इतकी’ असेल मागणी (Global Rice Production)

अहवालानुसार, तांदळाची जागतिक मागणी 2023-24 मध्ये 52 कोटी टन इतकी राहण्याची शक्यता आहे. जी मागील वर्षी 2022-23 मध्ये 52 कोटी टन इतकी नोंदवली गेली होती. तर 2021-22 मध्ये जागतिक पातळीवर 52.10 कोटी टन तांदळाची मागणी नोंदवली गेली होती. 2020-21 मध्ये जी 51 कोटी टन इतकी राहिली होती. दरम्यान सद्यस्थितीत जागतिक स्तरावर तांदळाचा साठा 17.10 कोटी टन इतका राहण्याचा अंदाज आहे. जो 2021-22 मध्ये 17.60 कोटी टन तर 2020-21 मध्ये 18.20 कोटी टन इतका राहिला होता.

निर्यातीस सरकारचा खोडा

भारत, थायलंड, व्हिएतनाम, अमेरिका, पाकिस्तान आणि म्यानमार हे प्रमुख तांदूळ निर्यातदार देश आहेत. भारत सरकारने सप्टेंबर 2022 पर्यंत तांदूळ निर्यातीवर पुर्णतः बंदी घातलेली होती. तर जुलै 2023 मध्ये गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदीची घोषणा केली होती. याशिवाय ऑगस्ट 2023 मध्ये सेला तांदूळवर 20 टक्के निर्यात शुल्क आकारण्याची घोषणा भारत सरकारकडून करण्यात आली होती. दरम्यान, अलीकडेच युरोप आणि मध्य-पूर्वेतील देशांमध्ये 5 लाख टन तांदूळ निर्यातीस भारत सरकारकडून परवानगी देण्यात आली होती.

error: Content is protected !!